‘तुतारी’ चिन्हावर निवडून आलेल्या आमदार बापूसाहेब पठारे यांच्या बालेकिल्ल्यातून पक्षाचे चिन्हच गायब : पठारेंच्या मुलगा, सून आणि भाचीला भाजपची उमेदवारी

वडगाव शेरीत 'पठारे पॅटर्न'ची चर्चा: बापूसाहेब राष्ट्रवादीत, तर मुलगा-सून अन् भाची भाजपच्या चिन्हावर मैदानात!
वडगाव शेरीत 'पठारे पॅटर्न'ची चर्चा: बापूसाहेब राष्ट्रवादीत, तर मुलगा-सून अन् भाची भाजपच्या चिन्हावर मैदानात!

Pune Municipal Corporation Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एक अनोखे आणि धक्कादायक राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पक्षाचे एकमेव आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) ज्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडून आले, त्याच पक्षाचे चिन्ह त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यातून गायब झाल्याचे दिसत आहे. आमदार पठारे (Bapusaheb Pathare) जरी शरद पवार गटाचे असले, तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मात्र भारतीय जनता पक्षाची कास धरली असून भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारीही जाहीर केली आहे.

राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, खुद्द आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) हे राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असतानाच, त्यांच्या घरातील सदस्य भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण करत होते. भाजपने आमदार किंवा खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे धोरण आखले असतानाही, पठारे कुटुंबातील तिघांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे (Surendra Pathare), त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे (Aishwarya Surendra Pathare) इतकेच नव्हे तर, पठारेंचे भाचे संतोष भरणे (Santosh Bharne) यांच्या पत्नीलाही भाजपनेच उमेदवारी जाहीर केली आहे. सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) प्रभाग क्रमांक ४ (खराडी-वाघोली), ऐश्वर्या सुरेंद्र पठारे (Aishwarya Surendra Pathare) प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-लोहगाव) मधून तर संतोष भरणे (Santosh Bharne) यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपच्या उमेदवार आहेत.

अधिक वाचा  #Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या सूचक व्यक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

आपला राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा करत पुन्हा शरद पवारांच्या पक्षात परतलेल्या बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझा मुलगा सुरेंद्र (Surendra Pathare) हा त्याचे स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम आहे. मात्र, मी स्वतः ‘तुतारी’चा आणि माझ्या पक्षाचाच इमानदारीने प्रचार करणार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. एकाच कुटुंबातील सदस्य दोन वेगवेगळ्या प्रमुख पक्षांतून आमनेसामने आल्यामुळे वडगाव शेरीतील ही निवडणूक संपूर्ण शहरासाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love