पुणे -बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारीवर्गाने ग्राहकांना उत्तम व चांगली सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन करावा. बँकेतर्फे ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनासाठी प्रोत्साहन देऊन बँकेचा व्यवसाय व गुंतवणूक वाढविण्यासाठी कर्मचारी वर्गाने प्रयत्न करण्याचे आवाहन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक एम कार्तिकेयन यांनी आज गुरुवारी पुण्यात केले.
कार्तिकेयन बँकेच्या पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील बँकेच्या विभागीय कार्यालयास भेटू दिली. बँकेच्या ग्राहक व कर्मचारी वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ग्राहक व कर्मचार्याकडून बँकेच्या कामकाजात ग्राहकांसाठी कोणत्या उपाययोजना व उपक्रम राबविता येतील याच्या सूचना समजावून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना बँकेच्या विविध योजना व उपक्रमाविषयी माहिती दिली.
ते म्हणाले की, बँकेतर्फे केंद्र सरकारच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजना, सूर्य घर बिजली योजना, पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योत योजना आदी योजनाना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही योजना नागरिक व ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांनी या योजनाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठी बँकेने महत्वाची भूमिका बजावली आहे.
बँक ऑफ इंडिया आणि सातारा येथील , मुथा फाउंडर्स तसेच संपूर्ण देशभरातील C-DAC संस्था, यांच्यामध्ये वेतन करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. या करारमुळे बँकेचे कार्पोरेट संबंध अधिक बळकट होतील असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केला.
ते पुढे म्हणाले की बँकेच्या संपूर्ण भारतात 1लाख 25 हजार तर, पुणे विभागात 92 शाखा आहेत. आम्ही बँकेचा व्यवसाय व उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न जोरात करत आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी यश आले आहे. ह्या कार्यक्रमात फिल्ड जनरल मॅनेजर श्री. दीपक गुप्ता, अंचलिक प्रबंधक श्री. संजय कदम, विपणन विभाग व इतर कर्मचारी उपस्थित होते.