पुणे : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी न-हे येथील उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत नाटक सादर केले. मानसिक समस्येतून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यावरील उपाय या नाटकातून सादर करीत विद्यार्थिनींनी जनजागृती केली.
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, महाविद्यालयाच्या प्राचार्य शितल निकम व उपप्राचार्य अनुश्री पारधी, समन्वयक श्वेता कुंभार व इतर शिक्षक उपस्थित होते. यावेळी ऍड. शार्दुल जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मानसिक आरोग्य हा एक सार्वत्रिक मानवी हक्क या संकल्पने अंतर्गत नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मानसिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स स्पर्धा देखील राबवण्यात आली.