पुणे (प्रतिनिधी): पुणे (Pune) जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्ता (Jejuri-Morgaon Road) यावर स्विफ्ट कार (Swift Car) आणि पीकअप टेम्पोच्या (Pickup Tempo) भीषण अपघातात (Accident) एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जेजुरी (Jejuri) मोरगाव (Morgaon) रस्त्यावरील एका कंपनी समोर बुधवारी रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सोमनाथ रामचंद्र बायसे (Somnath Ramchandra Bayse) (21), रामू संजीवन यादव (Ramu Sanjivan Yadav) (दोघेही रा नाझरेकप, ता. पुरंदर, जि. पुणे), अजयकुमार चव्हाण (Ajaykumar Chavan) (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (Ajit Ashok Jadhav) (रा. कांजळे, ता. भोर, पुणे), किरण भारत राऊत (Kiran Bharat Raut) (रा. पवारबाकी, ता. इंदापूर, पुणे), अश्विनी संतोष येसार (Ashwini Santosh Yesar) (रा. नागणसूर, हैद्राबाद, सोलापूर), अक्षय शंकर राऊत (Akshay Shankar Raut) (रा. झारगडवाडी, ता. बारामती, पुणे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, जेजुरी (Jejuri) मोरगाव (Morgaon) रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये (Hotel Shriram) पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील (Swift Car) पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.