पुणे(प्रतिनिधि)–ख्रिश्चन धर्मात जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेवर दबाव आणून एका घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पुण्यातील विमानतळ पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर धानोरी इथे घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करून धानोरीत बोलावले. नंतर यातील आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तक्रारदार महिलेला डांबून ठेवले. इतकेच नाही तर दोघांनीही पीडितेच्या डोक्याला बंदूक लावत ठार मारण्याची धमकी दिली. आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
नंतर आरोपी सागर लांडगेने लोहगाव परिसरात घेऊन जात एका खोलीत डांबले. दरम्यानच्या काळात पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या घरातील देवांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.