पुणे -टाटा ॲसेट मॅनेजमेन्ट हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या टाटा मल्टिकॅप फंड ह्या ओपन एन्डेड इक्विटी स्किमच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. गुंतवणूकीसाठी नवीन फंड सादर करणारी विंडो १६ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३० जानेवारी २०२३ रोजी बंद होईल. त्यानंतर वाटपझाल्यावर सातत्यपूर्ण विक्री आणि पुनर्खरेदीसाठी ही योजना नव्याने सुरू होईल.
ह्या उद्घाटनाच्या प्रसंगी भाषण करताना राहुल सिंग, सीआयओ- इक्विटीज्, टाटा ॲसेट मॅनेजमेन्ट म्हणाले, ”टाटा मल्टिकॅप फंड हा बाजारपेठेतील भांडवल/मार्केट कॅप्स धोरणे, विषय क्षेत्र तसेच औद्योगिक क्षेत्र अशासारख्या विविध बाबींवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे योग्य किंमतीमध्ये वाढ मिळू शकेल कारण एकंदरीतच पोर्टफोलिओमध्ये जोखमीशी जुळवून मिळणारे परतावे सुधारण्याचा आणि गुंतवणूकदाराला एक सुलभ आनंददायी अनुभव पुरविण्याचा हाच मार्ग असेल. आम्हाला असा विश्वास वाटतो की पुढील ३-५ वर्षांसाठी भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होण्याच्या शक्यता लक्षात घेता हा फंड एक उत्कृष्ट क्षमतेचा फंड म्हणून ओळखला जाईल.”
ह्या फंडाचा पोर्टफोलिओ हा स्थैर्य आणि संधी यांच्या दरम्यान योग्य समतोल देण्याचा हेतू बाळगून मिळकतीच्या चक्राच्या विविध टप्प्यांवर असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स पासून तयार झालेला असेल. मिळकतीच्या आवर्तनाच्या ह्या तीन क्षेत्रांची ढोबळ मानाने स्थैर्य मिळविणे, मिळकतीमध्ये वाढ आणि अर्निंग्स टर्न अराउंड अशी विभागणी करता येऊ शकेल. अशा प्रकारच्या एकत्रीकरणामुळे आपल्याला आधार देऊ शकणाऱ्या स्थिर गतीने प्रगती करणाऱ्या कंपन्या, उत्पन्नाच्या चक्रातील बदलामुळे लाभ होणाऱ्या कंपन्या ज्या मूल्यांकनाच्या रिरेटींगला कारण होतील आणि शेवटी उद्योग किंवा व्यवस्थापनातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या विपरीत परिस्थिती मधूनही सुधारणा होत असणाऱ्या कंपन्या होण्यास मदत होईल.
याची निफ्टी 500 मल्टिकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स यांच्यामध्ये बेंचमार्क झालेली आहे आणि ती तुम्हाला रेग्युलर आणि डायरेक्ट असे दोन प्लॅन्स देते.