मुंबई आणि पुण्यात सीबीआयने छापेमारी


पुणे–रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात सीबीआयने छापेमारी सुरु केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक असून प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.या सर्वांचे मोठे राजकीय कनेक्शन असून सीबीआयच्या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीआहे. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे ४० कोटींची संपत्ती यापूर्वी जप्त केली होती.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं- सुप्रिया सुळे