राजीव सातव यांच्या शरीरात आढळला सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus): काय आहे हा व्हायरस? आणि कोणाला आहे जास्त धोका?


पुणे(प्रतिनिधी)—गेले २३ दिवस कोरोनाशी झुंज देत असलेल्या काँग्रेसचे खासदार राजीव सातव  यांचे रविवारी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुख:द निधन झाले. सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात सायटोमॅजिलो विषाणू आढळून येतो.  

 सायटोमॅजिलो व्हायरस काय आहे?

सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळून येतो. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकी द्वारे प्रसारित होतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोका

अधिक वाचा  खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी: पुण्यामध्ये निधन

ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलोची लक्षणं कोणती?

सायटोमॅजिलोची प्राथमिक लक्षणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना कमतरता जाणवते. ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्ग झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमजिलो झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर केला जातो.

अधिक वाचा  सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशिल्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची नोंदणी पूर्ण

Source – tv9 marathi

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love