पुणे व्यापारी महासंघ करणार लॉकडाऊन बाबत शासनास सहकार्य


पुणे—.‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील लॉकडाऊन उठविण्यात आला होता. त्यामुळे राज्यात आणि पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात काही प्रमाणात अर्थगती येत होती. उद्योग, व्यापारी तसेच दुकानदार यांनीही याबाबत समाधान व्यक्त केले होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दि. १० जुलै रोजी झालेल्या प्रशासनच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला.

व्यापारी महासंघाने या लॉकडाऊनला विरोध केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉक डाऊनबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

अधिक वाचा  छत्रपती शिवराय हे तर जात, धर्म, प्रांताच्या पलीकडचे राजे- बाबासाहेब पुरंदरे

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घटटे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.

विशेष कार्य अधिकारी सौरभ राव म्हणाले, व्यापारी, दुकानदार हे अर्थव्यवस्थेचे मुलभूत स्त्रोत आहेत, परंतू दुकानात होणाऱ्या गर्दीमुळे तसेच सुरक्षित अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापरही दिसत नाही, यामुळे कोरानाबाधितांची संख्या वाढते आहे. कोणत्याही व्देषभावनेतून व्यापारी बांधवांवर कारवाई करण्यात येत नसून पुणे शहर व जिल्हयाला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी व कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊन आवश्यक आहे. पुणे व्यापारी महासंघाची कायम सहकार्याची भूमिका राहीली आहे, यापुढेही आपण कोरोनाच्या उच्चाटनासाठी मिळून काम करू व नक्कीच कोरोनाचे समूळ उच्चाटनासाठी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट नाही

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने कायम शासनाला सहकार्य केले आहे. लॉकडाऊनबाबतही सहकार्य अपेक्षित आहे. व्यापारी महासंघाच्या अडचणीबाबत प्रशासनाचीही कायम सहकार्याची भूमिका राहीली आहे, यापुढेही कायम सहकार्याची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी  पुणे शहरात व्यापारी वर्गावर १० लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे, लॉक डाऊनमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. व्यापारी वर्गाच्या अडचणी समजावून घेत त्यावर उपाययोजना करा, आम्ही शासनास सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गचा वाढता धोका विचारात घेत पहिल्या पाच दिवसानंतर पुढील पाच दिवसासाठी लॉक डाऊनमध्ये काय शिथिलता आणता येईल याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love