मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना – डंपर घरावर पलटला, दोन महिलांचा मृत्यू

मुळशी रिंग रोड डंपर अपघात
मुळशी रिंग रोड डंपर अपघात

पुणे(प्रतिनिधी)- मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या रिंग रोडच्या कामादरम्यान आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या भरावाचे काम सुरू असताना एक डंपर चालकाचा ताबा सुटून थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे.
मुळशी भागातील आपले साथीदार राज दुडेपाटील सध्या घटनास्थळी उपस्थित असून तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना मदत आणि नुकसानभरपाईबाबत निर्णय अपेक्षित आहे.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  Bharat Asmita National Award : भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर: प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, ज्योथिमणी सेन्नीमलाई, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान होणार सन्मान