हडपसरमध्ये ‘इंदिरा आयव्हीएफ’च्या नवीन केंद्राचे थाटात उद्घाटन

हडपसरमध्ये ‘इंदिरा आयव्हीएफ’च्या नवीन केंद्राचे थाटात उद्घाटन
हडपसरमध्ये ‘इंदिरा आयव्हीएफ’च्या नवीन केंद्राचे थाटात उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी):पुणे आणि परिसरातील निपुत्रिक दांपत्यांना आता जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक प्रजनन उपचार सुविधा हडपसरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल लिमिटेडच्या वतीने हडपसर येथील ‘४१ सिटी हब’ मध्ये नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश मुळीक, इंदिरा आयव्हीएफचे झोनल बिझनेस डायरेक्टर डॉ. अमोल लुंकड, डॉ. इशिता लुंकड, हडपसर सेंटर हेड डॉ. ईशा कपूर यांसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

उद्घाटनप्रसंगी बोलताना पवनीत कौर म्हणाल्या की, “स्थानिक स्तरावर आरोग्य सेवांचे जाळे बळकट करणे हे शहराच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. हडपसरमधील या केंद्रामुळे कुटुंबांना संघटित फर्टिलिटी केअर जवळ उपलब्ध झाली असून, पुनरुत्पादन आरोग्याबाबत वेळेवर सल्ला घेण्याचे महत्त्व यातून अधोरेखित होते.”

अधिक वाचा  पथनाटयांतून विद्यार्थ्यांनी केली मैत्री 'पंचमहाभूतांशी' : ६ वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

विशेष अतिथी योगेश मुळीक यांनी नमूद केले की, अशा केंद्रांमुळे समाजात फर्टिलिटी विषयाबाबत जागरूकता वाढेल आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळेल.

पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित उपचार

इंदिरा आयव्हीएफचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीज मुर्डिया यांनी सांगितले की, “हडपसरमधील हा विस्तार फर्टिलिटी केअर अधिक सुलभ आणि विश्वासार्ह करण्याच्या आमच्या मोहिमेचा भाग आहे. अनुभवी वैद्यकीय टीम आणि पुराव्यावर आधारित (Evidence-based) उपचार पद्धतींच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना सेवा देऊ.”

हडपसर सेंटर हेड डॉ. ईशा कपूर यांनी केंद्रबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “आमचे ध्येय केवळ वैद्यकीय उपचार करणे नसून, रुग्णांना भावनिक आधार देणे हे देखील आहे. विज्ञानाला आत्मीयतेची जोड देऊन आमची टीम कार्य करेल.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love