ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले : फडणवीसांचे विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान

Fadnavis challenges the opposition to an open debate
Fadnavis challenges the opposition to an open debate

पुणे(प्रतिनिधी)- “जो ओबीसी (OBC) नाही, असा एकही नकली व्यक्ती ओबीसी आरक्षणा (OBC reservation) चा लाभ घेऊ शकणार नाही. या संदर्भात जीआर (GR) मध्ये पुरेशी काळजी घेण्यात आली असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “ओबीसी समाजाला त्यांचे हित पाहणारे कोण आहेत हे चांगलेच समजते,” असा टोला विरोधकांना लगावला. ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले आहे असे सांगत याबाबत खुल्या चर्चेचे आव्हानही फडणवीस यांनी विरोधकांना दिले.

फडणवीस रविवारी विविध कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे सरकारने गमावलेले ओबीसी समाजाचे आरक्षण परत आणले

फडणवीस म्हणाले की, “जो ओबीसी नाही, असा एकही नकली व्यक्ती ओबीसी आरक्षणा चा लाभ घेऊ शकणार नाही. या संदर्भात जीआर (GR) मध्ये पुरेशी काळजी घेण्यात आली आहे”. त्यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार (Wadettiwar) यांच्यावरही निशाणा साधत म्हटले की, “ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले आहे. २०१४ पासून आतापर्यंत ओबीसी समाजासाठी घेतलेले सर्व महत्त्वाचे निर्णय केवळ आमच्या सरकारनेच घेतले आहेत”. स्वतंत्र ओबीसी मंत्रालय (OBC ministry) आणणारे आम्ही, ओबीसीसाठी योजना तयार करणारे आम्ही, महाज्योतीची (Mahajyoti) स्थापना करणारे आम्ही आणि ओबीसीसाठी ४२ वसतिगृहे उपलब्ध करून देणारेही आम्हीच आहोत. तसेच, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गमावलेले २७ टक्के राजकीय आरक्षण परत आणण्याचे कामही आपल्याच सरकारने केले असल्याचा दावा त्यांनी केला. “ओबीसी समाजाला त्यांचे हित पाहणारे कोण आहेत हे चांगलेच समजते,” असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी ओबीसी हिताच्या संदर्भात आपल्या सरकारने केलेल्या कामावर विरोधकांशी खुल्या चर्चेलाही आव्हान दिले.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : निलेश चव्हाणची विकृती चव्हाट्यावर : स्पाय कॅमेऱ्याने पत्नीचे खासगी क्षणांचे व्हिडिओ केले रेकॉर्ड

तोपर्यंत दोन समाजातील तेढ कमी होणार नाही

लातूर (Latur) जिल्ह्यात दोन ओबीसी (OBC) तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेबद्दल बोलताना फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत दोन समाजातील तेढ कमी होणार नाही”. आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘आरक्षण गेलेले आहे’ अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही बाजूंनी राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाने समाजाचे कधीच भले होऊ शकत नाही. वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवली तरच समाजाचे भले होऊ शकते. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवत आहोत. समाजाची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे नेत्यांनी कितीही राजकारण केले याला राजकीय मुद्दा बनवला तरी हा समाज वास्तविकत समजून घेतो हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

केवळ ज्यांच्याकडे कुणबी (Kunbi) नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्रे मिळणार आहेत, बिना नोंदीचे कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. समाजाचे भले केवळ वास्तविकता पोहोचवल्यानेच होऊ शकते, राजकारणाने नव्हे, असा टोलाही त्यांनी मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना लगावला.

अधिक वाचा  ज्येष्ठ इतिहासकार तथा संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न

पवार साहेब ‘एक्स’ म्हणाले की ‘वाय’ समजायचे याकरता प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याची एकीची वीण उसवली जात असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच, वर्तमानपत्रात सरकारविरोधात ‘देवा तूच सांग’ अशा आशयाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, “पवार साहेब (Pawar Saheb) ‘एक्स’ म्हणाले की ‘वाय’ समजायचे याकरता प्रसिद्ध आहेत.” ते मोठे नेते असल्याने त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.


लवकरच प्राध्यापकांच्या ८० टक्के जागा भरणार

राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. ही खरी गोष्ट आहे. मागच्या काळामध्ये ८० टक्के पदे भरण्याची राज्यशासनाने परवानगी दिली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मागे लागून ती परवानगी घेतली. अतिशय पारदर्शीपणे या नेमणुका झाल्या पाहिजेत असे राज्यपालांचे मत होते त्यामुळे या प्रक्रियेमध्ये काही बदल केले. त्यामुळे वेळ गेला आहे. पण, आता हे बदल पूर्ण झालेले आहेत. लवकरच ८० टक्के पदेही भरली जातील. उरलेल्या २० पदे भरण्यालाही लवकरच परवागी देणार आहोत.

एनआरएफ रँकींग (NRF ranking) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) घसरलेल्या रँकींगबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, एनआरएफ रँकींगमध्ये शिक्षकेतर पदांचा समावेश नाही. त्याचा रँकीगचा काहीही संबंध नाही. शिक्षक, विद्यार्थी गुणोत्तर आहे यात थोडे मार्क कमी झाले आहेत. हे गंभीर आहे. इतर काही बाबींमध्ये मार्क कमी झाले आहेत. त्यासंबंधात सुधारणांसंबंधी कुलगुरुंशी चर्चा केली आहे, त्याची सुधारणा आपण लवकरात लवकर करू, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या प्रगतीत व स्थैर्यात खीळ घालणारा भाजपचा सत्तालोलुप हव्यास अखेर ऊघड - गोपाळदादा तिवारी

आमची भूमिका ‘डीजे मुक्तीची’च

गणेशोत्सवातील डीजे (DJ) वापराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, “आमची भूमिका ‘डीजे मुक्तीची‘ (DJ free) आहे.” या गणेशोत्सवात डीजे वाजवणाऱ्यांची संख्या कमी होती आणि महानगरांमध्ये त्यावर बंदी घालण्यासारखी परिस्थिती होती. लोकांमध्ये जागृती करून डीजेमुक्त उत्सव साजरे करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


जो कोणी डोके वर काढेल, त्याचे डोके खाली करू पुणे येथे गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय तरुणाची टोळीयुद्धातून हत्या झाल्याच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केले. “पुण्यात (Pune) टोळीयुद्ध वगैरे काही नाही. ही आपापसातील शत्रुता असून, ती आम्ही चालू देणार नाही,” असे फडणवीस यांनी बजावले. “जो कोणी डोके वर काढेल, त्याचे डोके कसे खाली करायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love