लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान

माऊलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान
माऊलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान

पुणे(प्रतिनिधी)–  टाळ मृदंगाचा नाद…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् पावसाचा अखंड वर्षाव…अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले.

प्रस्थान सोहळय़ाचा अमृतानुभव घेण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणीकाठी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकऱयांनी प्रस्थान सोहळय़ाची वाट धरली आणि या जलधारांच्या साक्षीनेच सोहळा पार पडला. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती, गोपाळपुरा, विश्रांतवाड परिसर वारकऱयांनी दुमदुमून गेला. देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, ऍड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर या वेळी उपस्थित होते.

संतश्रे÷ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळय़ास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी वीणामंडपात कीर्तन झाले. साडेतीन वाजेपर्यंत दर्शनबारी सुरु होती. सायंकाळी पाच ते सात दरम्यान माउलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक झाली. प्रस्थान सोहळय़ातील मानाच्या ४७ दिंडय़ांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. सर्व दिंडय़ा मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे पुढे सरकत होत्या. वीणा-टाळ-मृदंगाच्या गजराने माउली तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा आणि दीराला २८ मे पर्यंत कोठडी

रात्री सातनंतर पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळय़ाला सुरुवात झाली. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माउली संस्थानातर्फे श्रींची आरती झाली. वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱयावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. चलपादुकांची विधिवत प्राणप्रति÷ा झाली. सर्वांच्या मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माउली माउली’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळय़ाची रंगत वाढतच गेली. सोहळा सुरू असताना दिंडय़ांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माउलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आणण्यात आले. अश्वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. अश्व महाद्वारातून बाहेर पडताच मंदिरातील दिंडय़ा मंदिराबाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर निघताच उपस्थित वारकरी, भक्तांनी एकच जल्लोष सुरू केला. पालखी खांद्यावर घेण्यासाठी वारकरी, भाविकांची झुंबड उडाली होती. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाडय़ात दाखल झाली. शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

अधिक वाचा  खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

जलधारांसोबत वारकऱयांच्या आनंदाला उधाण

पहाटे पासून पवित्र इंद्रायणी नदीला पूर आला होता. दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या. या आल्हाददायक वातावरणात राज्यभरातून आलेल्या वैष्णवांनी दुथडी भरुन वाहणाऱया इंद्रायणीत तीर्थ स्नान केले. इंद्रायणीचे दोन्ही काठ ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात मंत्रमुग्ध झाले होते. यादरम्यान, सोहळय़ात सहभागी झालेले दोन वारकरी इंद्रायणीच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, एनडीएआरएफच्या पथकाने त्यांना वाचवले.

तरुणाईचा उत्साह

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात येणाऱया देंडय़ांमध्ये तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण-तरुणींबरोबरच शहरी भागातील तरुण वर्गाचा सहभागही होता. गळय़ात टाळ घेऊन तसेच डोक्मयावर तुळशी वृंदावन घेऊन हे तरुण दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ासाठी होणाऱया गर्दीचा अंदाज घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. शेकडो पोलीस रस्त्यावर थांबून सुरक्षिततेची काळजी घेत होते. पालखी सोहळय़ात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांचीही नेमणूक केली. प्रस्थान सोहळय़ानंतर माउलींची पालखी आळंदीतच आजोळघरी मुक्कामी राहते. त्यामुळे माउलींचे मंदिर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट, तसेच संपूर्ण आळंदी शहरातच पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love