संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या (Santshreshtha Dnyaneshwar Mauli) पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी (Ashwaraj – revered horses) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला (Shrimant Dagadusheth Halwai Ganpati) अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम… माऊली माऊली (Dnyanoba Mauli Tukaram… Mauli Mauli) आणि गणपती बाप्पा मोरयाचा (Ganpati Bappa Morya) जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कर्नाटक बेळगावमधील (Karnataka Belgaum) अंकली (Ankali) येथून शितोळे सरकार (Shitole Sarkar) यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Shrimant Dagadusheth Halwai Sarvajanik Ganpati Trust), सुवर्णयुग तरुण मंडळ (Suvarnayug Tarun Mandal) तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने (Sunil Rasane), कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी (Mahesh Suryavanshi), ज्ञानेश्वर रासने (Dnyaneshwar Rasane), मंगेश सूर्यवंशी (Mangesh Suryavanshi), राजाभाऊ पायमोडे (Rajabhau Paymode), प्रतीक घोडके (Pratik Ghodke), राजू वायकर (Raju Waikar), रोहित लोंढे (Rohit Londhe) यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार) (Shrimant Urjitsinh Shitole (Sarkar)), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) (Shrimant Mahadji Raje Shitole (Sarkar)), युवराज विहानराजे शितोळे (सरकार) (Yuvraj Vihanraje Shitole (Sarkar)), श्रीमंत सौ. मोहिनीराजे शितोळे (सरकार) (Shrimant Sau. Mohiniraje Shitole (Sarkar)) यांसह पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार - नाना पटोले

शितोळे सरकार (Shitole Sarkar) म्हणाले, दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे (Alandi) प्रस्थान करतील.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने (Sunil Rasane) म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची (Wari) शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी (Ashadhi Wari) ही विठ्ठल भक्तांची (Vitthal Bhakt) वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

अधिक वाचा  #वैष्णवी हगवणे खून प्रकरण :अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको : अजित पवार

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी (Mahesh Suryavanshi) म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत हरित वारी (Harit Wari), स्वच्छता अभियान (Swachhta Abhiyan), रुग्णवाहिका सेवा (Ruknwahika Seva – Ambulance Service), आरोग्य तपासणी (Arogya Tapasani – Health Check-up), भोजन सेवा (Bhojan Seva – Food Service) अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारकऱ्यांच्या (Warkari) सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love