आळंदीत माऊलींच्या पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक

आळंदीत माऊलींच्या पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक
आळंदीत माऊलींच्या पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक

पुणे (Pune) (प्रतिनिधी) : येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणा-या बैलजोडीची सेवा देण्याचा मान यावर्षी अर्जुन घुंडरे पाटील (Arjun Ghundre Patil), विवेक घुंडरे पाटील (Vivek Ghundre Patil) यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास चारही बैलजोड्यांची आळंदीतील (Alandi) श्री स्वामी महाराज मठ (Shri Swami Maharaj Math) येथून नगरप्रदक्षिणामार्गे मिरवणूक झाली. दोन जोड्या महाद्वार चौक माऊली मंदिरा समोर आणण्यात आल्या.

मिरवणूक हरिनाम जयघोषात वाजत गाजत झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ढोलताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी मिरवणूक काढत बैलजोडीची जोरदार स्वागत केले.बैलजोडीचे आळंदी देवस्थानने (Alandi Devasthan) देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरा (Mauli Mandir) समोरील महाद्वार समोर केली. पहिल्यांदाच माऊली मंदिरा समोर श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीस नियोजनाअभावी सर्व चारही बैल जोड आणण्यात आले नाहीत. पूजा करण्यास दोन बैल जोड मंदिरासमोर आणण्यात आले.

अधिक वाचा  पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर - मुरलीधर मोहोळ : फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ 

मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे (Shri Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee) वतीने दोन्ही बैलजोडीची पूजा करण्यात आली. या वेळी नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal), संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब (Yogi Niranjan Nathsaheb), पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे (Bhavarth Dekhne), विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप (Adv. Rajendra Umap), विश्वस्त निलेश महाराज लोंढे (Nilesh Maharaj Londhe), पुरुषोत्तम महाराज पाटील (Purushottam Maharaj Patil), रोहिणी पवार (Rohini Pawar), पंढरपूर देवस्थान विश्वस्त ॲड. माधवी निगडे (Adv. Madhavi Nigade), व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर (Dnyaneshwar Veer), तुकाराम माने (Tukaram Mane), बैल समितीचे प्रमुख बबनराव कुऱ्हाडे पाटील (Babanrao Kurhade Patil), माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील (Rahul Chitalkar Patil) आदीसह आळंदीतील नागरिक, विविध आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणार्‍या टोळीला बेड्या

श्रींचा वैभवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात होत असतो. तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थ देखील श्रींचा पालखी रथ ओढणारी मानाची बैलजोडीची भव्य मिरवणूक काढत असतात. यावेळी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात चार बैल जोड मिरवणूक झाली. युवक तरुणांच्या तरुणाईचे जल्लोषात मिरवणूक झाली. घुंडरे पाटील (Ghundre Patil) यांनी भव्य भारदस्त बैल जोडी लाखो रुपये देऊन विकत आणली आहे. या शिवाय पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवत दक्षता घेतली आहे. या लक्षवेधी बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत, हरिनाम जयघोषात झाली. यावेळी भाविक, नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्वामी महाराज मठापासून (Swami Maharaj Math) चाकण चौकातून मिरवणूक सुरु झाली. स्वामी महाराज (Swami Maharaj) यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये मुकुंद गांधी (Shrikshetropadhye Mukund Gandhi) परीवारांतर्फे स्वागत पूजा करण्यात आली. घुंडरे पाटील (Ghundre Patil) परिवारातील गृहिणींनी मिरवणुकीचे सांगतेत सर्व बैलजोडीची पूजा करून औक्षण केले.

अधिक वाचा  ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाईट्स पुण्यात दाखल

माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या हस्ते बैल जोड पूजन

पालखी रथास परंपरेने एकच जोड लावला जातो. मागील वर्षा पासून दोन बैल जोड आणि आता यावर्षी तर चक्क चार बैल जोड अशा ८ बैलांची मिरवणूक झाली. मात्र माऊली मंदिर महाद्वारात केवळ दोन बैल जोड यांची पूजा नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांचे हस्ते झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love