पुणे- नाईकनवरे डेव्हलपर्स तर्फे आयोजित ‘नाईकनवरे ग्रीनस् क्लासिक’ गोल्फ स्पर्धेत जिआ कर्दभजने आणि विदीश कर्दभजने या जोडीने गोल्ड विभागामध्ये तर, सिल्व्हर विभागात आनंद शहा आणि मोनज गेरा या जोडीने सर्वाधिक गुणांसह विजेतेपद संपादन केले.
पुना क्लब गोल्फ कोर्स येथे झालेल्या या स्पर्धेत गोल्ड विभागामध्ये जिआ कर्दभजने आणि विदीश कर्दभजने यांनी ३९ गुणांसह विजेतेपद मिळवले. याच विभागात राजिव पुसाळकर आणि आदित्य पुसाळकर यांनी ३७ गुणांसह उपविजेते मिळवले. सिल्व्हर विभागामध्ये आनंद शहा आणि मोनज गेरा यांनी ४० गुणांसह विजेतेपद मिळवले तर, इंद्रनील मुजगुले आणि ऋषी भोसले यांनी उपविजेतेपद मिळवले.
क्लोजेस पुट ऑन १८ गटात प्रज्ञेश नवलखा याने सर्वाधिक लांब (३५ फुट) अंतर गाठून विजेतेपद मिळवले. क्लोजेस टू पिन गटात जज्ञा बिष्णोई याने पहिला क्रमांक मिळवला. स्ट्रेटेस्ट ड्राईव्ह गटात चेतन रिग्झीन याने पहिला विजय मिळवला. लाँगेस्ट ड्राईव्ह गटात मुरद पलमकोटे याने (२४२ यार्ड) पहिला क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे पारितोषिक नाईकनवरे डेव्हलपर्सचे रणजीत नाईकनवरे, कॅब्रेल नाईकनवरे, नील नाईकनवरे, हेमंत नाईकनवरे, विलास नाईकनवरे, आनंद नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत सर्व गटांतील विजेत्या आणि उपविजेत्यांना करंडक आणि प्लेट्स अशी पारितोषिके देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकालः
गोल्ड विभागः विजेते- जिआ कर्दभजने आणि विदीश कर्दभजने- ३९ गुण; उपविजेते- राजिव पुसाळकर आणि आदित्य पुसाळकर- ३७ गुण;
सिल्व्हर विभागः विजेते- आनंद शहा आणि मोनज गेरा- ४० गुण; उपविजेते- इंद्रनील मुजगुले आणि ऋषी भोसले- ४० गुण;
क्लोजेस पुट ऑन १८: विजेता-प्रज्ञेश नवलखा;
क्लोजेस टू पिनः विजेता-जज्ञा बिष्णोई;
स्ट्रेटेस्ट ड्राईव्हः विजेता- चेतन रिग्झीन;
लाँगेस्ट ड्राईव्हः विजेता- मुरद पलमकोटे (२४२ यार्ड);