वाल्मीक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील

वाल्मीक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील
वाल्मीक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील

पुणे(प्रतिनिधी)– बीडमधील  मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडचा वाकड येथील फ्लॅट सील करण्यात येणार आहे. या फ्लॅटचा दीड लाखांचा मालमत्ता कर थकला आहे.

वाकड येथील पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 601 क्रमाकांचा वाल्मीक कराड आणि त्याची पत्नी मंजली कराड यांची सदनिका आहे. 16 जून 2021 रोजी ही सदनिका खरेदी केली आहे. सदनिका खरेदी केल्यापासून कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेने कराडच्या सदनिकेवर 21 नोव्हेंबर 2024 जप्ती अधिपत्र चिटकविले आहे. कराडकडे एक लाख 55 हजार 444 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे सदनिका सील केली जाणार आहे. दरम्यान, कराड याची वाकड येथे आणखी एक सदनिका आहे.

अधिक वाचा  राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

याबाबत कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे म्हणाले, कराड यांच्या सदनिकेची एक लाख 55 हजारांची थकबाकी आहे. त्यामुळे सदनिका सील केली जाणार आहे. थकबाकी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love