‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी : घे भरारी’ योजने अंतर्गत तीन मुलींचे स्वीकारणार पालकत्व

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी

पुणे-  समाजातील आर्थिक दृष्टीने दुर्बल मुलींना दर्जात्मक शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळवून देऊन त्यातून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य निर्माण व्हावे यासाठी ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या धर्मादाय ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या वर्षी, आपल्या ‘घे भरारी’ या योजने अंतर्गत ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ ही संस्थेच्या गायत्री रावडे, दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींचे कायम स्वरूपी पालकत्व स्वीकारणार आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती व्यतिरिक्त, या मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने भर दिला जाणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप नूलकर यांनी दिली.

रविवार, दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वा. सीओईपीच्या एस.एल. किर्लोस्कर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर असतील. तसेच ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ च्या संचालिका रूपाली शिंदे-आगाशे, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपूण धर्माधिकारी आणि कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे उपस्थित राहतील.

अधिक वाचा  पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे-अजित पवार

‘घे भरारी’ या उक्ती नुसार शहरातील ८ ते १० या वर्गात शिकणार्‍या मुलींचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या वर्षी पालकत्व स्वीकारण्यात आलेल्या तीन मुलींना त्या आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होई पर्यंत मदत केली जाणार आहे. ही योजना दर वर्षी अंमलात आणली जाणार आहे. समाजातील आर्थिक दृष्टीने दुर्बल मुलींची जवाबदारी घेणे, त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देणे, त्यांचे मानसिक आरोग्य सांभाळणे आणी उपजत असलेल्या कला गुणांना वाव देऊन त्यांना सर्वांगिण दृष्टिने सक्षम करण्यासाठी काम केले जाणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love