रामगिरी महाराजांविरोधातील ९९ टक्के ट्वीट परदेशातून : राज्यात अराजकता माजविण्याचा कट?

99 percent of tweets against Ramgiri Maharaj are from abroad
रामगिरी महाराजांविरोधातील ९९ टक्के ट्वीट परदेशातून

मुंबई-  महंत श्री रामगिरी महाराज यांना जिहादच्या नावाखाली लक्ष्य करण्यात आले होते. राज्यात अराजकता माजविण्यासाठी ट्वीटरवर मोहिम उघडण्यात आली होती. ज्यातील ९९ टक्के ट्वीट हे परदेशी हॅंडलवरून होते. असा खुलासा भोपाळ येथील सोशस मीडिया रिसर्च सेंटरने केला आहे. या संदर्भात महंत रामगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या सुमारे दीड तास कालावधीच्या प्रवचनातील काही भागाचे संदर्भ वगळून तयार केलेल्या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा…’ यासारख्या घोषणा देत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये धर्मांध लोकांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी दगडफेक करत राज्यात दंगलसदृश्य परिस्थिति निर्माण केली.

महंत श्री रामगिरी महाराजांना अटक करावी अशी मागणी काहींनी केली, तर काहींनी थेट त्यांच्या हत्येच्या धमक्या दिल्या. यामुळे दहशतीचे वातावरण तयार झाले. काही धर्मांध व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन महंत श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. परंतु, या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने असदूद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादून मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे महाराष्ट्रातील नेते इम्तियाज जलिल, वारिस पठाण आणि प्रक्षोभक व देशविरोधी वक्तव्ये करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या काही धार्मिक पुढाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ‘तिरंगा संविधान यात्रा’ काढली. या यात्रेच्या संदर्भात लोकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास सोशल मीडिया रिसर्च सेंटरने केला आहे.

अधिक वाचा  होळी आणि धुळवड साजरे करण्यास बंदी

काही प्रतिक्रियाकर्त्यांनी महंत श्री रामगिरी महाराज आणि  नीतेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तर काही जणांनी काँग्रेस पक्षाचचे नेतते  राहुल गांधी यांनी या संदर्भात भूमिका न घेतल्यास मुस्लिम काँग्रेसला समर्थन देणार नाहीत असा इशारा देखील दिला.

भारताच्या विविध राज्यांमधून तसेच पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, अमेरिका, पॅलेस्टाइन, कतार यासह अनेक देशांमधून वापरण्यात येणार्याम ट्विटर हँडल्सचा वापर या यात्रेच्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी करण्यात आल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. एकूण प्रतिक्रियांपैकी ६७.३% प्रतिक्रियांचा उगम महाराष्ट्राबाहेर, विशेषत: उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारमध्ये झाला असल्याचे आढळून आले.

९९.२३ टक्के ट्विट्स खोटे

या प्रकरणात #ArrestRamgiriMaharaj, #ArrestNiteshRane, #ArrestRamgiri, #AllEyesOnIndianMuslims, #Musalman, #Sikandar, #ISLAM, #OurProphetOurHonour, #MaharashtraPolitics या हॅशटॅग्जचा वापर करण्यात आला होता असे निरीक्षण या अभ्यास अहवालात नोंदवण्यात आले आहे. या विषयावर प्रसारित झालेल्या ट्विट्सममध्ये ओरिजिनल ट्विट्सचे प्रमाण केवळ ०.७६ टक्के एवढे होते, तर ९९.२३% ट्विट्स रिट्विट करण्यात आलेली होती असेही या अहवालात नमूद केले आहे.

अधिक वाचा  शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याने खळबळ

या यात्रेमध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते असा दावा करत काही खोटी छायाचित्रे देखील समाजमाध्यमांच्या द्वारे प्रसारित करण्यात आली होती. यातील अनेक ट्विट्स व पोस्ट फेक न्यूज होत्या आणि या दाव्यांना सत्य दर्शवण्यासाठी या यात्रेशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसलेली ईस्ट तिमोर, मुंबई येथे विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजययात्रा इत्यादि प्रसंगांची छायाचित्रे प्रसारित केली गेली असे फॅक्ट चेक करणाऱ्या  अनेक वेबसाईट्सनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोणतीही खोटी बातमी आणि पोस्ट विरोधात कारवाई करावी; द्वेषपूर्ण भाषण म्हणून कोणत्याही सामग्रीमध्ये फेरफार करणे आणि सोशल मीडियावर माहितीचा गैरसमज पसरवणे, ज्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा असामाजिक आणि देश-विरोधी शक्तींवर कारवाई करावी अशी मागणी महंत रामगिरी महाराज यांनी केली.

अधिक वाचा  मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

हिंदू साधुंविरोधात खोटे नरेटीव्ह  

एक खोटी कहाणी सतत हिंदू साधू-संत आणि नेत्यांबद्दल तयार करण्यात येत आहे. अनेकदा चर्चा आणि भाषणांचे काही भाग कापले जातात, संपादित केले जातात आणि संदर्भातून बाहेर खेळवले जातात, ज्यामुळे खोटी बातमी तयार होते. त्यानंतर या व्हिडिओ, संदेश आणि पोस्ट सोशल मीडियावर फिरवले जातात. ज्यामुळे अस्वस्थता, गोंधळ आणि दंगलींना प्रोत्साहन दिले जाते. अशा समाज विरोधी घटकांवर सरकारने तात्काळ कारवाई, अशी मागणी रामगिरी महाराज यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love