राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा
राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा, असे आवाहनराष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे  परागजी कंगले (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संघटक मंत्री , रा.स्व.संघ जनकल्याण समिती ) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागातील सुखसागर नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमीच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केले.

या प्रसंगी व्यासपीठावर कात्रज भागाचे  संघचालक  श्री. शिवाजीराव मालेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कुंजीर (लघु उद्योजक आणि गायत्री इंडस्ट्रीजचे संस्थापक),  शैलेश गोखले (सुखसागर नगर कार्यवाह) उपस्थित होते.

कंगले म्हणाले, आपल्या परंपरेत विजयादशमी हा उपासनेचा दिवस आहे, असुरी शक्तीवरती विजयाचा दिवस आहे. रामाचा रावणावर म्हणजेच नीतिचा अनीतिवर विजय आहे.पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी याच दिवशी संघाची स्थापना केली. याच दिवशी पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी बंधू भावाचा उद्घोष करणाऱ्या बौद्ध मताचा स्वीकार केला.

अधिक वाचा  अन्यथा छोटे उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही- अभय भोर

हिंदू समाज हा या राष्ट्रातच नाही तर जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि योग्य नीति स्थापित करण्यात अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे. त्यासाठी जगाला नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता आपल्या हिंदू समाजात आहे.संघाचे काम असे राष्ट्रीय विचार वाढवणाऱ्या स्वयंसेवकांचा समूह निर्माण करणे, हे कार्यकर्ते देशाच्या विविध क्षेत्रात जाऊन कर्तृत्व व नेतृत्व गाजवून या मातृभूमीला संपन्न करतील असे व्यक्तिनिर्माण करणे हे आहे.असे सक्षम नेतृत्व हिंदू समाजातून येण्यासाठी आधी आपला समाज हा पूर्णपणे निर्दोष आणि संघटित असावा, असे मत यावेळी त्यांनी मांडले.

संघाच्या शताब्दी वर्षात आपला समाज सक्षम व निर्दोष होण्यासाठी संघाने येत्या काळात पंचसूत्रींवर भर देण्याचे ठरविले आहे, ही पंचसुत्री म्हणजे

१. कुटुंब प्रबोधन

अधिक वाचा  पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची विक्रमी ३० तासानंतर सांगता

२. सामाजिक समरसता

३. स्व-बोध

४. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन

५. नागरिक कर्तव्य

हे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र यायला हवे. समाज निर्दोष व संघटित होण्यासाठी, ही आपली सर्वांची जबाबदारी समजून नित्यनियमाने करण्याची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा समावेश अगदी सहजपणे करता येईल. आणि त्याचा परिणाम फक्त कौटुंबिक पातळीवर नव्हे तर भविष्यात सर्व जगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल यात शंका नाही, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष कुंजीर यांनी सुद्धा आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास भागातील स्वयंसेवक, नागरिक माता- भगिनींची, मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love