पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ : केंद्र सरकारची कारवाई

पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ

नवी दिल्ली/पुणे- यूपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती आणि अपंगत्वाबद्दल खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून यूपीएससीने अपात्र घोषित केलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला आता केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.

आयएएस (उमेदवारी) नियमावली १९५४ च्या नियम १२ अन्वये पूजा खेडकर हिच्यावर ही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सन २०२३ च्या  प्रशिक्षणार्थी तुकडीतील पूजा खेडकर २०२२ मध्ये ८४१ वा क्रमांक मिळाला. जून २०२४ पासून ती प्रशिक्षण घेत होती. आरक्षण मिळण्यासाठी तिने २०२२ च्या ‘यूपीएससी’ परीक्षेमध्ये स्वत:बद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. वय बदलून, तिच्या पालकांबद्दल चुकीची माहिती आणि ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा नागरी सेवा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. यूपीएसच्या नियमानुसार प्रशिक्षणार्थी सनदी अधिकाऱ्यांना वैद्यकीय चाचणी देणे आवश्यक असते. मात्र, पूजा खेडकरने वेगवेगळी कारणे सांगत सहा वेळा वैद्यकीय चाचणीस नकार दिला होता.

अधिक वाचा  डोळ्यातील बाहुल्यांंसारखा फिरणारा कॅमेरा असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च

‘यूपीएससी’ने केलेल्या तपासणीत खेडकर दोषी आढळली होती. यानंतर ३१ जुलैला तिची निवड रद्द करण्यात आली. खेडकरच्या अंतरिम जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आपण ‘एम्स’मध्ये अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले आहे. याबाबत ४ सप्टेंबरला दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या नवीन अहवालात, हेडकर हिने ‘यूपीएससी’ ला सादर केलेल्या दोन अपंगत्व प्रमाण पत्रांपैकी एक बनावट असल्याचा संशय आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला आहे. त्यामुळे तोपर्यंत पूजा खेडकर हिचा अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love