पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणार्‍या टोळीला बेड्या

पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणार्‍या टोळीला बेड्या
पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणार्‍या टोळीला बेड्या

पुणे (प्रतिनिधी)-ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदीरातील दानपेटी फोडणार्‍या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील १ लाख ५ हजारांचा ऐवज आणि दुचाकी असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. स्वरुप राजेश चोपडे (वय २१ रा मांजरी बुद्रुक)  राजन पटेल,  अक्षय शाहू , अथर्व वाटकर,  अमित शेरीया (सर्व रा. नागपुर)  यांना अटक केली आहे.

तारकेश्वर मंदिरात   देणगीदारांकडून देणगी स्विकारली जाते. तसेच   देणगीदारांसाठी गुप्त दान पेटयांची व्यवस्था मंदिरात आहे. मंदिर देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी ट्रस्टकडून सुरक्षारक्षक नेमले आहेत. असे असतानाही ४ जूनला पहाटेच्या सुंमारास चोरट्यांनी  मंदिरातील   ६ दानपेटया फोडून दोन लाखांची रक्कम चोरून नेली होती. गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक  स्वप्निल पाटिल तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी तपासाला गती दिली.  पुणे ते  नगर येथील अहिल्यानगरपर्यंत जवळपास २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला.

अधिक वाचा  राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे : राज ठाकरे

हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन  महत्वपुर्ण गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले.  गुन्हयातील संशयीत आरोपी स्वरूप चोपडे याला ४ ऑगस्टला पथकाने पुणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबूली दिली.  आरोपी नामे अथर्व वाटकर याला नागपूरमधून अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक  रविंद्र शेळके,  पोलीस निरीक्षक छगन कापसे,  दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोना सागर जगदाळे, प्रविण खाटमोडे,पोअं अनिल शिंदे,सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love