‘एमआयटी एडीटी’त गुरुवारपासून (दि. ८ ऑगस्ट) ‘दीक्षारंभ-२४

At MIT ADT from Thursday (August 8) 'Diksharambh-24
At MIT ADT from Thursday (August 8) 'Diksharambh-24

पुणे :  येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ९व्या बॅचचा स्वागत समारंभ अर्थात ‘दिक्षारंभा-२४’ची सुरुवात गुरुवार (ता.८ ऑगस्ट) पासून होणाऱ्या भव्य कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमासाठी खास उभारण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद सभामंडपात’ हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हा तीन दिवसीय कार्यक्रम पार पडेल.
माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भारताच्या एरोनाॅटीकल सोसायटीचे अध्यक्ष तथा रक्षा मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार डाॅ.जी सतीश रेड्डी व ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) सेक्रेटरी प्रा.राजीव कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत. 
या तीन दिवसीय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठाबद्दल तसेच, विद्यापीठाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणारे कलागुणा सादर करण्याचीही संधी प्राप्त होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.चोपडे यांनी दिली आहे.   
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल -अमित शहा : मुख्यमंत्री भाजपचा असण्याचे दिले संकेत