तर …पुढचा मुख्यमंत्री मीच असेन : रामदास आठवले

तर ...पुढचा मुख्यमंत्री मीच असेन : रामदास आठवले
तर ...पुढचा मुख्यमंत्री मीच असेन : रामदास आठवले

पुणे(प्रतिनिधि)– देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांमधील वाद मिटला नाही, तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन”, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील रंगशारदामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “एकतर तू राहशील नाहीतर मी राहिन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेवर तुटून पडले आहेत. दरम्यान, आठवले यांना याबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. यांचा जर वाद मिटला नाही तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार आहे, असं आठवले म्हणाले.

अधिक वाचा  मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही ; राजसत्तेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा- प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते

दरम्यान, राजकारणामध्ये दोघेही राहतील. एकाचं राजकारण होत नसतं. उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. माझी दोघांनाही विनंती आहे की, राजकारणामध्ये दोघांनी राहायला हवं दोघेही माझे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही. एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर ते कदाचित बाहेर पडले नसते, असं रामदास आठवले म्हणाले.

जे. पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कोणालातरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणारच आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तर ती आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस राष्ट्राध्यक्ष झाले तर भाजप अजून मजबूत होईल. फडणवीसांचा भाजपला चांगला उपयोग होऊ शकतो. फडणवीस यांना संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असंही रामदास आठवले म्हणाले.

अधिक वाचा  निष्पापांचे बळी जाण्यावर,जाब विचारणे,खंत, दुःख व संताप व्यक्त करणे हे राजकारण नाही

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love