एमआयटी एडीटी विद्यापीठात इंग्रजी साहित्य परिषद

MIT-ADT Host's Virtual International Conference on English Literature
MIT-ADT Host's Virtual International Conference on English Literature

पुणेः इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईल) आणि एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्य परिषदेचे २६ व  २७ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या दोन दिवसीय साहित्य परिषदेद्वारे ‘Global Perspectives: Diverse Voices in English Literature’ या विषयावर संशोधक, लेखक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह साहित्यीक विविधतेवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील. चर्चासत्रांद्वारे साहित्याला कशाप्रकारे सीमारेषेची बंधने नसतात व ते जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाद्वारे कशाप्रकारे प्रभाव पाडत आहे यावर प्रकाश टाकला जाईल. विद्यापीठात २६ व २७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या या परिषदेत  इंग्रजी साहित्यीक, शिक्षक, संशोधक व साहित्य रसिकांनी भाग घ्यावा व नावनोंदणीसाठी http://www.englishliteraturesummit.com  या संकेस्थळाला भेट द्यावी असे आवाहन स्कुल ऑफ हाॅलिस्टिक डेव्हलपमेंटचे प्रमुख प्रा. डाॅ.अतुल पाटील यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  Vinesh, you are a champion among champions! : PM Modi's emotional post