मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता तुमचं समर्थन आहे का? : फडणविसांचं पवार,ठाकरे आणि पटोलेंना थेट आव्हान

Fadnavis' direct challenge to Pawar, Thackeray and Patole
Fadnavis' direct challenge to Pawar, Thackeray and Patole

पुणे(प्रतिनिधि)— मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं समर्थन आहे का? हे एकदा हे स्पष्ट करा असे थेट आव्हान देत तुमची ही दुटप्पी भूमिका सोडा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.दरम्यान, पवार साहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? असा सवालही त्यांनी केला.

पुण्यातील बालेवाडी येथे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात फडणवीस बोलत होते.

फडणवीस मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे की, जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू त्याबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.  तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. महाविकास आघाडीचे हे तिन्ही नेते आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत. मराठा आणि ओबीसी समजाला झुलवत ठेवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीचा हा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत.  दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की, हे समाज एकमेकांसमोर उभे ठाकले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायेत असा आरोप त्यांनी केला.

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपची भूमिका

निवडणुका येतील आणि जातील. एखादे सरकार बनेल, एखादे राहणार नाही. सरकार येतात आणि जातात. पण, समाज एकसंघ राहिला पाहिजे. एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान तीन पिढ्यातील दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही. आम्ही आमच्या समाजालाकुठे  नेतो आहोत? आम्ही नेमकं काय करतो आहोत? याचा देखील विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाचा पहिला बळी अण्णासाहेब पाटील

फडणवीस यांनी आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? असा सवाल करीत १९८२ साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की, तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवेल. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते, असे ते म्हणाले.

शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?

१९८२ पासून ते २०१४ पर्यंत भाजपचे सरकार येईपर्यंत अनेक सरकारे आली. त्यातली जास्तीत जास्त सरकारे  काँग्रेसची होती. शरद पवार साहेबांचे सरकार होते. पवार साहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला. तुम्ही चार वेळा  रेकॉर्डवर सांगितलं की, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. हे मी नाही बोललो.  कोण बोलले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.

आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं

होय आम्ही आरक्षण दिले, आमचे सरकार होतं तोपर्यंत सुप्रीम कोर्टात तीन वेळा केस लागली. सुप्रीम कोर्टाने नकार दिला जोपर्यंत आम्ही होतो. सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीत ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण गेले. त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही. पुन्हा एकनाथराव शिंदे यांचा सरकार आलं. आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं.  आज भरती चाललेली आहे. पोलीस भरतीमध्ये हजारो तरुण आता मराठा समाजाचे भरती झाले आहेत. हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरती झालेली आहे.

मराठा आरक्षणाचं राजकारण चाललंय

हे सगळं होत असताना देखील मराठा आरक्षणाचे राजकारण चाललंय. अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांचे मी अभिनंदन करेन. आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्याला निधी दिला. या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. आज सारथीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात आणि म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयएस झालो, मला आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. कारण आपल्या सरकारने सारथी सुरू केलं. पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाही, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते - अमित शहा
अधिक वाचा  पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल- अमित शहा
अधिक वाचा  शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो- अमित शहा
अधिक वाचा  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल -अमित शहा : मुख्यमंत्री भाजपचा असण्याचे दिले संकेत

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love