पुणे -पुणे हे वेगाने विकसित होणारे महानगर आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आम्ही भाजपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा पाया भक्कम करण्यास सुरूवात केली. यातील अनेक प्रकल्पांचे काम आठ ते दहा वर्षे असे दीर्घकाळ चालणारे आहे. यातील काही प्रकल्प मार्गीही लागले आहेत. मेट्रो, ई-बस खरेदी, रेल्वे, विमानतळ, रिंगरोड, मल्मिमोडल हब, आरोग्य यंत्रणाचे सक्षमीकरण, स्वच्छ शहर, शहरातील टेकड्यांवरील वनीकरण, पर्यावरण टिकविण्यासाठी उपाययोजना, समान पाणीपुरवठा योजना, पाण्यासाठी नवीन स्त्रोत, आवास योजना, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन आणि शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जतन करणे या माध्यमातून मला पुण्याला देशाचे सर्वोत्कृष्ट शहर बनवायचे आहे. आपल्या सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि आनंददायी जीवनासाठी, विकसित पुण्यासाठी आपण मला आपले बहुमूल्य मत द्याल, ही अपेक्षा व्यक्त करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. आपल्या मतामुळे देशाच्या आणि पर्यायाने पुण्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळणार आहे.
प्रचार काळातील अनुभव
“संपूर्ण प्रचार काळात शहरातील वाड्या-वस्त्यांपासून, सोसायट्यांना भेटी दिल्या. आबालवृद्ध, महिला, युवकांनी भरभरून स्वागत केले. या निमित्ताने त्या त्या भागातील नागरी प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांतील भाजपच्या सत्ताकाळात झालेली विकासकामे आणि विविध योजनांचा लाभार्थ्यांना मिळालेले लाभ याबद्दल नागरिक भरभरून बोलत होते. आम्ही मोदीजींचा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. नागरिक आपल्या समस्या मांडत होते. संपूर्ण शहराचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने, विकसित भारतासाठी आम्ही आमच्या योजना आणि जाहीरनामा नागरिकांपर्यंत पोहोचवला. तो तयार करण्यासाठी पुणे नेक्स्टच्या माध्यमातून पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचाही जाहीरनाम्यात समावेश केला. कोरोना काळात आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामाची लोकांना जाणीव होती. ती त्यांनी पदोपदी बोलून दाखवली. पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला पुणेकरांकडून खूप प्रेम आणि विश्वास मिळाला. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. अधिक चांगले सामाजिक, राजकीय काम करण्याची प्रेरणा मला मिळाली. मतदारांचा मतरूपी आशिर्वाद मला १३ मे रोजी मिळेल आणि मी विक्रमी मताधिक्याने विजयी होईन, नव्हे विजयाचे रुपांतर महाविजयात होईल असा विश्वास वाटतो. सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.”
असा केला प्रचार
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहर, विधानसभा आणि प्रभाग स्तरावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. ज्यात प्रचाराचे नियोजन केले आणि रणनीती आखण्यात आली.
सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन याप्रमाणे १८ प्रचार फेऱ्यांचे आयोजन करून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
याच प्रमाणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, सौ. मोनिका मोहोळ यांच्या नेतृत्वात घरोघरी जाऊन संपर्क साधला.
राष्ट्रीय राज्यस्तरीय नेत्यांचा सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी., प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदी राष्ट्रीय आणि प्रदेश स्तरावरील नेत्यांनी प्रत्यक्ष प्रचारात सहभाग घेतला.
महत्त्वाच्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या.
स्थानिक नेत्यांचा सहभाग
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे, प्रभारी माधव भांडारी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, राजेश पांडे, जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, गणेश बिडकर, योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, मनसेचे शहर प्रमुख साईनाथ बाबर, मनसेचे नेते बाबू वागसकर, संजय आल्हाट, भरत लगड, शैलेश चव्हाण, सचिन खरात, संजय सोनवणे यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय ए महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते.
विविध मेळावे
युवा मोर्चा, एससी मोर्चा, एसटी मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, राजस्थानी आघाडी, उत्तर भारतीय आघाडी, दक्षिण भारतीय आघाडी, हिंदुत्ववादी संघटना, गणेशोत्सव मंडळे, खेळाडू संघटना, रिक्षा संघटना, डॉक्टर आघाडी, व्यावसायिक आघाडी, सीए-सीएस मेळावा, व्यापारी मेळावा, सहकार आघाडी, मराठा समाज, ब्राम्हण समाज, बारा बलुतेदार, कोकण रहिवासी, नाभिक समाज, कुंभार समाज, माळी समाज, ख्रिश्चन समाज यांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आणि प्रचारात सक्रिय सहभागही घेतला.
पारंपरिक आणि आधुनिक प्रचार
पारंपरिक प्रचार, पथनाट्य, वासुदेव यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला
व्हिडिओ रथ, समाजमाध्यमे, वेबसाईट, वर्तमानपत्रे, इलेक्टॉनिक मीडिया यांच्या माध्यमांतून प्रभावी प्रचार केला
सकाळच्या वेळेत उद्याने, हास्यक्लब, व्यायामाला येणारे नागरिक, टेकड्यांवरील नागरिकांच्या भेटी घेतल्या
विविध कंपन्यांच्या कामगारांच्या भेटी घेतल्या.व्यक्ति म्हणून मी सर्वत्र पोहोचण्यात मर्यादा आहेत. परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जात प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे, पुण्यासाठीचे केंद्र आणि राज्य सरकारचे योगदान, माझा सामाजिक, राजकीय कार्य-अहवाल, परिचय पत्र याद्वारे भाजप महायुतीचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व कार्यकर्त्यांप्रती मी कृतज्ञ आहे.