मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका

Chandrakantada Patil's marathon meetings to increase the vote margin of Muralidhar Mohol
Chandrakantada Patil's marathon meetings to increase the vote margin of Muralidhar Mohol

पुणे–पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. दोन दिवस पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या बैठका घेऊन मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग मिळाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. शुक्रवारी महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, मंडल अध्यक्ष, विस्तारक सोशल मीडिया आणि आयटी सेल यांची बैठक घेतली. शनिवारी अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपट्टी आघाडी, वैद्यकीय आघाडी, पर्यावरण आघाडी, उत्तर व दक्षिण भारतीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सहकार, पायाभूत सुविधा, शिक्षक भटके विमुक्त आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तसेच, पदाधिकाऱ्यांच्या सूचना देखील जाणून घेतल्या.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाचे 'ब्लड सॅम्पल'च बदलले : ससूनच्या दोन डॉक्टरांना बेड्या

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. तसेच, वर्षानुवर्षे प्रलंबित अनेक विषय मार्गी लावले आहेत. आपल्या मानबिंदूंची पुनर्स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे. राज्य सरकारने ही अनेक जटिल विषय मार्गी लावले आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी; आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षण मोफत केले. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. नुकतेच त्याचे भूमिपूजन देखील झाले.

ते पुढे म्हणाले की, कोविड काळात मुरलीधर मोहोळ यांनी महापौर नात्याने पुणे शहराला केले काम फारच परिणामकारक होते. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे पुणे शहराने कोविडवर यशस्वी मात केली. पुणेकरांना याची जाणीव आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांना खासदार बनविण्यासाठी पुणेकर मतदान करणारच आहेत. पण तरीही कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना दिल्या.

अधिक वाचा  पुण्यात होणाऱ्या ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्सचा सहभाग

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास आहे. मोदीजींनी सर्वसामान्यांचा नेहमीच विचार केला. माननीय  मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात देशात केलेले काम, विकास कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावे, असे आवाहन केले.

या बैठकीला शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवी साळेगावकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सर्वच आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुरलीधर मोहोळ विक्रमी मतांनी विजयी होतील, असा संकल्प व्यक्त केला.

सीएए निर्वासितांना नागरिकत्व देणारा कायदा

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेला नागरिकता सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशातील त्रासाला कंटाळून भारतात आलेल्या निर्वासित सहा धर्मियांना नागरिकत्व देणारा कायदा आहे. कोणाचंही नागरिकांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. त्यामुळे सीएएबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

अधिक वाचा  तिहेरी तलाक या प्रथेविरुद्ध आयुष्य वेचणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचे निधन

विरोधकांच्या राज्य घटना बदलाच्या अपप्रचाराला खोडून काढा

विरोधकांकडे मुद्दे नसल्याने, ते राज्यघटना बदलाचा अपप्रचार करत आहेत. उलट कॉंग्रेसने स्वतः च्या स्वार्थासाठी ४० वेळा घटना बदल केला. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन हुकूमशाही आणली. त्यामुळे हे सर्व जनतेसमोर मांडून विरोधकांचे मुद्दे वेळीच खोडून काढा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love