पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘प से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी सहकलावंतांसमवेत सादर केला याचे संयोजन प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोळंकी यांनी केले. यावेळी, सभागृह रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.
या कार्यक्रमात गायिका श्रद्धा गायकवाड,सूर्या शिवरामन,लीना काळे,श्रद्धा कांबळे, भाविका कुलकर्णी,अनुपमा कुलकर्णी आणि गायक प्रशांत साळवी , उमेश कुलकर्णी, अद्वैत लेले, हिमांशू शिवम’आणि निखील देशपांडे यांनी संगीतकार आर. डी. बर्मन यांनी गायलेली व संगीत दिलेली लोकप्रिय गाणी सादर केली. यामध्ये मोनिका + दूनियामे लोगोंको,चला जाता हू,आओ ना गले लगाओ ना, नाम गुम जायेगा,एक लडकी को देखा तो ऐसा लगा, हाय रे हाय तेरा घुंगटा,आजा आजा मे हू प्यार तेरा,ये जवानी है दिवानी,जाने जा ढूंढता अशी असंख्य लोकप्रिय गाणी सादर करण्यात आली. यातील इतर अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी वन्स मोर दिला.
यावेळी गायकांना अमन सय्यद (सिंथेसायझर), ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅड, रीदम मशीन), हार्दिक रावल (लीड गीटार), लिजेश शशिधरन (बेस गिटार),श्रीपाद सोलापूरकर (सॅक्सोफोन) , नितीन शिंदे (तबला, तूंबा ,ढोलक),आयुष शेखर (ड्रम) यांनी वाद्यसंगत केली. याप्रसंगी कमिटी मेंबर अतुल गोंजारी, राजाभाऊ साठे, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे, नरेंद्र काते, राजेश सनगर उपस्थित होते.
आयडीएफसी बँक, त्रिविक्रमा आॅईल, कॉसमॉस बँक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प,नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत