पुणे- ना-नफा तत्त्वावर आधारित संस्था सातारा रनर्स फाऊंडेशनद्वारे आयोजित केली जाणारी बहुप्रतिक्षित जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन (एसएचएचएम) चे १२ वे पर्व ३ सप्टेंबर २०२३ रोजी देशभरातील रनिंग उत्साहींना एकत्र आणण्यास सज्ज आहे. ७,५०० नोंदणींच्या विक्रमासह ही भारतातील तिसरी सर्वात मोठी हाफ मॅरेथॉन इव्हेण्ट आहे आणि देशातील सर्वात खडतर मॅरेथॉन मानली जाते. यंदाच्या मॅरेथॉनसाठी थीम आहे ‘सर्वे धावकह कुटुंबकम’ म्हणजे ‘सर्व रनर्स एकच कुटुंब आहेत’. या थीमचा अॅथलीट्समध्ये एकतेच्या भावनेला चालना देण्यासोबत स्वास्थ्याप्रती पुढाकार घेण्यास प्रेरित करण्याचा उद्देश आहे. या इव्हेण्टचे टायटल स्पॉन्सर जय बालाजी ग्रुप आहेत, तर स्केचर्सचे पाठबळ आहे.
२०१२ मध्ये डॉ. संदीप काटे यांनी सुरू केलेली जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन भारतातील सर्वात मोठी समुदाय-आयोजित मॅरेथॉन इव्हेण्ट आहे. या मॅरेथॉनने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ‘द मोस्ट पीपल इन सिंगल माऊंटेन रन’चा किताब प्राप्त करत आपली छाप निर्माण केली आहे. संपन्न वारसा असलेल्या जेबीजी एसएचएचएमने टाटा मुंबई मॅरेथॉन आणि वेदांत दिल्ली हाफ मॅरेथॉन यानंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी इव्हेण्ट म्हणून स्थान मिळवले आहे. उल्लेखनीय ५६१२ निश्चयी फिनिशर्स असलेली ही देशातील महिला रनर्सची सर्वाधिक संख्या असलेली दुसरी सर्वात मोठी मॅरेथॉन आहे. आयजी कृष्णा प्रकाश व विश्वास नांगरे पाटील यांसारख्या प्रख्यात व्यक्ती यापूर्वीच्या पर्वांमध्ये सहभागी राहिले आहेत आणि यंदा देखील मॅरेथॉनमध्ये मान्यवर पाहायला मिळतील. या साहसी रनमध्ये प्रख्यात व्यक्ती सहभाग घेणार आहेत, जसे आयजी कृष्णा प्रकाश, आयजी रविंदर सिंगल, सातारा पोलिसचे एसपी समीर शेख, सातारा सिव्हिल सर्जन डॉ. युवराज कर्पे.
सातारा रनर्स फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे म्हणाले, थीम ‘सर्वे धावकह कुटुंबकम’चे आमच्या मनात खास स्थान आहे. आमचा रनर्समध्ये त्यांची पार्श्वभूमी किंवा अनुभवाकडे न पाहता साहचर्याची भावना निर्माण करण्यावर विश्वास आहे. ही मॅरेथॉन शारीरिक चॅलेंजच्या तुलनेत एकता व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करते, ज्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी रनिंग करण्याच्या एकमेव उद्देशासह विविध समुदाय एकत्र येतात. आमच्या फाऊंडेशनला वर्षानुवर्षे व्यापक व उल्लेखनीय यश मिळाले आहे. व्यक्तींना जीवनाचा मार्ग म्हणून रनिंगचा अवलंब करण्यास प्रेरित व सक्षम करण्याचा आणि रनिंग सहजसाध्य, सर्वसमावेशक व साजरे केले जाईल अशी संस्कृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
आगामी मॅरेथॉनमध्ये ‘आऊट अॅण्ड बॅक’ कोर्सचा समावेश असेल, ज्याची सुरूवात सातारा पोलिस परेड ग्राऊंडपासून होईल. इव्हेण्ट सकाळी ६.३० ते सकाळी १०.३० पर्यत आयोजित करण्यात आली आहे. या इव्हेण्टला देशभरातून ७५०० हून अधिक सहभागींचा प्रतिसाद मिळाला आहे. इव्हेण्ट सहभागींना त्यांच्या फिनिश वेळांनुसार विविध पुरस्कारांसह सन्मानित करते, ज्यामुळे त्यांच्या प्रयत्नामध्ये उपलब्धीची भर होते.
एसएचएचएमच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी सहभागी अनुभव वाढण्याप्रती, तसेच १६-आठवड्यांचे प्रशिक्षण उपक्रम व इव्हेण्ट मेमोरालिलियाप्रती वापरला जातो. तसेच, इव्हेण्ट सातारामध्ये ओपन जिम्स व स्ट्रीट वर्कआऊट स्टेशन्स स्थापित करत समुदायाप्रती योगदान देते. ज्यामधून फिटनेस व स्वास्थ्याला चालना दिली जाते. आतापर्यंत एसएचएचएममध्ये २०,००० हून अधिक अद्वितीय रनर्स, ३६.५ टक्के रिपीट रनर्स, नोंदणी दिवसांदरम्यान ३५,००० हून अधिक व्हिझिट वेबसाइट्स आणि ६०० हून अधिक सदस्य व स्वयंसेवक पाहायला मिळाले आहेत, जे रनला पाठिंबा देतात. सातारा रनर्स फाऊंडेशन १ व २ सप्टेंबर २०२३ रोजी (२ दिवस) अनुक्रमे स्थानिक रनर्स व आऊटस्टेशन रनर्ससाठी त्यांचे रेस किट/बीआयबी गोळा करण्यासाठी प्री-इव्हेण्ट एसएचएचएम एक्स्पोचे आयोजन करणार आहे. जागतिक समुदायाकडे वाटचाल करत जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनने प्रतिष्ठित असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स अॅण्ड डिस्टन्स रेसेस (एआयएमएस) मध्ये सदस्यत्व मिळवले आहे.