पुण्यात १८ व १९ जानेवारी रोजी ८ व्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन

पुण्यात १८ व १९ जानेवारी रोजी ८ व्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन
पुण्यात १८ व १९ जानेवारी रोजी ८ व्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन

पुणे(प्रतिनिधि)–पुण्यामधील रायटिंग वंडर्सच्या वतीने येत्या शनिवार दि. १८ आणि रविवार दि. १९ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान डी. पी. रस्त्यावरील सिद्धी गार्डन येथे महोत्सव संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक आणि या संकल्पनेचे उद्गाते सुरेंद्र करमचंदानी यांनी कळविली आहे. आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे हे ८ वे वर्ष आहे.

१८ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, मगरपट्टा सिटी गृपचे संचालक सतीश मगर, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रणजीत जगताप, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या पुणे विभागाचे प्रमुख सुशील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होईल. कुमार प्रॉंपर्टीजचे केवलकुमार जैन, सी.टी. पंडोल & सन्सचे कावास पंडोल, बी. यू. भंडारीचे शैलेश भंडारी, पेन संग्राहक असलेले प्रो. यशवंत पिटकर आणि युसुफ मन्सूर आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित असतील.

अधिक वाचा  खणलेल्या खड्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

महोत्सवाबद्दल माहिती देताना सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “लेखणी अर्थात पेन ही जणू आठवणींची एक कुपी आहे असे आपण म्हणू शकू. जुने पेन आपल्याला भूतकाळात घेऊन जातात तर नवीन पेनचे कौतुक आपल्याला वेगळ्याच विश्वास रमवते. असेच अनेकविध प्रकारचे पेन एकाच छताखाली पाहण्याची संधी आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवानिमित्त आम्ही पुणेकरांसाठी घेऊन आलो आहोत. आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे हे सलग ८ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुणेकर रसिक आमच्या या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देतील असा आम्हाला विश्वास आहे.”  या वर्षी देखील उत्तम कारागिरी असलेल्या नाविन्यपूर्ण अशा विविध पेनांचे प्रदर्शन महोत्सवात पुणेकरांना पाहता येणार असल्याचेही करमचंदानी यांनी सांगितले.

आठवा आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव हा पेनप्रेमी, पेन संग्राहक तसेच लेखकांसाठी एक अनोखा अनुभव देणारा असणार आहे. जगभरातील ७५ हून अधिक पेन उत्पादकांचे विविध पद्धतीचे पेन पाहण्याची व हाताळण्याची पर्वणी पेन प्रेमींना यानिमित्ताने मिळेल. विविध प्रकारचे फाऊंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन यांसोबतच खास लिमिटेड एडिशन असलेले पेन, १०० हून अधिक प्रकारची शाई, उच्च दर्जाचे लेदर पेन पाउचेस देखील यावेळी उपलब्ध असतील. तसेच महोत्सवादरम्यान हस्ताक्षर तज्ज्ञ, सुलेखनकार आणि विविध प्रकारे मराठी स्वाक्षरी करू शकणाऱ्या कलाकारांशी सवांद साधण्याची संधीही पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.

अधिक वाचा  ३ए कंपोझिट्सच्या फ्लॅगशिप ब्रँड अल्युकोबॉन्डचे अलुकोड्युअल' हे प्रीमियम उत्पादन सादर

अनेक नामवंत डॉक्टर, वकील, बिल्डर, आर्किटेक्ट, शिक्षणतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट  हे प्रदर्शनाला भेट देणार आहेत. विविध क्षेत्रातील या मान्यवरांशी संवाद साधण्याची ही उत्कृष्ट संधी आहे.

महोत्सवास भेट देणाऱ्या पेनप्रेमींसाठी आयोजकांच्या वतीने एका विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून ५० हून अधिक उत्तम प्रतीचे पेन जिंकण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे.

या दोन दिवसीय महोत्सवाबरोबरच रायटिंग वंडर्स तर्फे गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी शहरातील सुमारे ३५ शाळांमध्ये हस्ताक्षर दिन साजरा केला जाणारा आहे. या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये ३३००० विद्यार्थी सहभागी होणार असून विजेत्यांना ३०० हून अधिक बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या शाळांना कोणतेही प्रवेशशुल्क नाही अशी माहितीही करमचंदानी यांनी कळविली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love