मर्सिडीजखाली चिरडून ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

41-year-old man dies after being crushed under Mercedes
41-year-old man dies after being crushed under Mercedes

पुणे,- येरवडा येथे मर्सिडीज बेंझ खाली चिरडून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. येरवडा पोलिसांनी गाडी चालकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. पोर्श कारच्या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडली. मात्र पोलिसांनी चालक सज्ञान असून त्याने मद्यपान केले नसल्याचे सांगितले.


केदार मनोहर चव्हाण (४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चालक नंदु अर्जुन ढवळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार केदार हे इलेक्ट्रीकल स्कुटरवरुन चालले होते. यावेळी रॉंग साईडने आलेल्या मर्सिडिज कारला पाहून त्यांनी ब्रेक दाबला, यामुळे त्यांची स्कुटर घसरून ते मर्सिडीज कारखाली सापडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांना मृत घोषीत करण्यात आले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  गवत,जाळ्या आणि झुडुपांनी वेढलेल्या तोरणा किल्ल्याने घेतला मोकळा श्वास