पुणे(प्रतिनिधि)– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (दि.१३ मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे .दरम्यान,राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण ९ विभागांमध्ये २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर २८५ विद्यार्थी हे ३५ टक्के गुण मिळवून काठावर पास झाले आहेत
यंदाही मुलींनीच मारली बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेमध्ये एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.
२११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण तर २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण
राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण ९ विभागांमध्ये २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर २८५ विद्यार्थी हे ३५ टक्के गुण मिळवून काठावर पास झाले आहेत. ३५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे. तर कोकणाचा निकाल अव्वल असून कोकणात एकाही विद्यार्थ्याला ३५ टक्के मिळालेले नाहीत.
प्रथम श्रेणीत उतीर्ण विद्यार्थी
राज्यात ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
द्वितीय श्रेणीत उतीर्ण विद्यार्थी
राज्यात ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उतीर्ण झाले आहे. म्हणजे ४५ टक्के किंवा ४५ टक्केपेक्षा जास्त आणि ६० टक्यांपेक्षा कमी गुण मिळवून ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण होऊ न शकलेले विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण ८६ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.
७,९२४ शाळांचा निकाल १००%
“राज्यातील २३,४८९ माध्यमिक शाळांतून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे.
पुरवणी परीक्षेसाठी १५ मे पासून अर्ज
दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील. सेच, जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज १५ मेपासून भरून घेण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले
विद्यार्थ्यांना आवाहन
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळांकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.