12 वीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के-यंदाही मुलींचीच बाजी


सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक महामंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी चा ऑनलाईन निकाल आज (गुरुवार दि. १६ जुलै) रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक कमी निकाल लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यावेळेस परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. तर कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय एमसीव्हीसीचा ९५.०७ टक्के, निकाल लागला आहे.

अधिक वाचा  ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेदभाव करण्याचा शासनाचा मानस का? -अ. भा. ब्रह्म अखिल महाशिखर परिषद

 कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे. पुणे ९२. ५० टक्के, मुंबई ८९ .३५ टक्के, कोल्हापूर ९२ .४२ टक्के, अमरावती ९२.०९ टक्के, नाशिक ८८ .८७ टक्के, लातूर ८९. ७९ टक्के, कोकण  ९५ . ८९ टक्के, नागपूर ९१.६५  टक्के, औरंगाबाद ८८ .१८ टक्के.

इयत्ता १२वीचा ऑनलाईन निकाल गुरुवारी (दि. १५ जुलै रोजी जाहीर झाला

कोरोनाच्या संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. मे-जून महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला आहे.  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही १५ जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं.

विभागनिहाय निकाल

कोकण – ९५.८९ टक्के

पुणे – ९२.५० टक्के

कोल्हापूर – ९२.४२ टक्के

अमरावती – ९२.०९ टक्के

अधिक वाचा  ब्ल्यू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या १५  वर्षीय मुलाने जीवन संपवलं : गॅलरीतून जम्प कर, कागदावरील स्केचनं उलगडलं मृत्यूचं गूढ

नागपूर – ९१.६५ टक्के

लातूर – ८९.७९ टक्के

मुंबई –८९.३५ टक्के

नाशिक – ८८.८७ टक्के

औरंगाबाद – ८८.१८ टक्के

कोणत्या शाखेचा निकाल किती टक्के?

विज्ञान – ९६.९३ टक्के

वाणिज्य – ९१.२७

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ८६.०७

कला – ८२.६३

निकालाची वैशिष्ट्ये

परीक्षेला बसलेले विद्यार्थी –  १४,१३,६८७

उत्तीर्ण विद्यार्थी – १२,८१,७१२

उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – ९३.८८

उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – ८८.०४

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ९३.५७  टक्के उत्तीर्ण

पुनर्परीक्षार्थी निकाल – ३९.०३ टक्के उत्तीर्ण

१५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के

मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

१) ऑनलाईन निकालाबाबत लगेच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळालवरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत:च्या किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवारी १७ जुलै ते सोमवार २७ जुलैपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार १७ जुलै ते बुधवार ५ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल

अधिक वाचा  महाविद्यालये सुरु करण्याबाबत अद्याप कुठलाही आदेश नाही -उदय सामंत

२) फेब्रुवारी-मार्च- २०२० परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांतच

पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित निभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love