मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वत:चे विलगीकरण (आयसोलेट) केले आहे. राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत:ला आयसोलेट केल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गरज भासल्यास येत्या काही दिवसांत राज्यपाल कोशियरी यांचीही तपासणी केली जाईल, असे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजभवनमधील १६ कर्मचार्यांपैकी दोन कर्मचारी आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर शनिवारी राज्यपालांच्या कार्यालयातील सुमारे १०० स्टाफ सदस्यांची राज्यातील जे जे हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की १९९ पैकी १६ लोकांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे.
दरम्यान, भारतातील सर्वाधिक प्रभावित राज्यात महाराष्ट्रात शनिवारी कोरोनोचे ८,१३९ नवीन रुग्ण आढळले आणि २२३ लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात राज्यात पहिल्यांदाच ८,००० हून अधिक रुग्ण आले. राज्यात एकूण रूग्णांची संख्या वाढून १,४६,६०० झाली.