पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली


पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पुण्यातील पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच शनिवारी पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

कोरोना साखळी तुटत नसल्याने पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयावरून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच आता मनपा आयुक्तांची सुट्टी करण्यात आली आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची आयुक्तपदी नियुक्ती करंत आली आहे. शेखर गायकवाड यांच्याकडे पुन्हा एकदा साखर  आयुक्तपदाचा पद्भार्देण्यात आला आहे.

दरम्यान, शेखर गायकवाड यांच्या तडकाफडकी बदलीवरून चर्चेला उधाण आले असून लॉकडाऊन बाबत वेगळी भूमिका घेतल्याने त्यांची बदली केली असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह पाऊस होणार

विक्रम कुमार यांच्या रिक्त झालेल्या जागी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर साखर आयुक्त सौरव राव यांना विभागीय आयुक्तालयात ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक जितेंद्र दुडी यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करणात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love