गल्वान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चीनच्या सैनिकांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारांचे आयोजन न करण्यासाठी चीनचा कुटुंबीयांवर दबाव


वॉशिंग्टन(एएनआय)—गल्वान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांच्या धुमश्चक्रीत मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांच्या बलिदानाकडे चीन दुर्लक्ष करत असल्याचे वृत्त आहे.  अमेरिकेच्या इंटेलिजन्स असेसमेंट रिपोर्टनुसार चीन आपल्या सैन्याने केलेल्या त्यागाला मान्यता देण्यास तयार नाही. त्यात म्हटले आहे की चीन सरकार संघर्षात ठार झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांवर मृत सैनिकांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारांचे आयोजन न करण्यासाठी दबाव आणत आहे.

१५ जून रोजी पूर्व लडाखच्या गल्वान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली. या घटनेत जीवितहानी झाली. यामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले हे सत्य भारताने निर्विवादपणे मान्य केले. भारताच्या मारल्या गेलेल्या सैनिकांना हिरोप्रमाणे सन्मान देण्यात आला. दुसरीकडे, चीनने आपल्या सैनिकांचा मृत्यू स्वीकारला नाही.

अधिक वाचा  दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग कोणी केला?

२८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात  गल्वान खोऱ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आणि सैन्य दलातील जवानांबद्दल शोक व्यक्त केले. ते म्हणाले की या सैनिकांच्या कुटुंबांचे बलिदान हे पूजा करण्यालायक आहे.

या घटनेला महिना उलटल्यानंतरही चीनने या रक्तरंजित संघर्षात मरण पावलेल्या आपल्या सैनिकांच्या संख्येविषयी कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. आपले प्रियजन गमावलेल्या दुःखी चिनी कुटुंबांवर चीनी सरकारकडून अत्याचार होत आहेत. पूर्वी, या घटनेनंतर चिनी सरकारने आपल्या जवानांचे होणारे नुकसान स्वीकारण्यास नकार दिला होता आणि आता मृत सैनिकांच्या नातेवाईकांना त्यांचे मृतदेह पुरण्यास मनाई केली आहे.

यूएस न्यूजने आपल्या अहवालात म्हटले आहे की अमेरिकेच्या इंटेलिजेंस असेसमेंट रिपोर्टच्या अहवालानुसार, बीजिंगने केलेली ही मोठी चूक लपवण्यासाठी चीन आपले सैन्य चकमकीत ठार झाले हे स्वीकारायला तयार नाही. पूर्व लडाखमधील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न जेव्हा चिनी सैन्याने केला तेव्हा हा संघर्ष झाला. चीनकडून याबाबतीत उच्च पातळीवरील करार झाला असता तर हा संघर्ष टाळता येऊ शकला असता  असे भारताने म्हटले आहे.

अधिक वाचा  इंटरनेट सर्चमध्ये ट्रम्प, बिडेन यांच्यापेक्षा आघाडीवर?

चीन सरकारने आतापर्यंत केवळ काही अधिकाऱ्यांच्या मृत्यूची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात चीनच्या ४३ सैनिकांचा मृत्यू झाल आहे. त्यामध्ये  मृत आणि गंभीर जखमींचा समावेश होता. दुसरीकडे, अमेरिकी गुप्तचर अहवालात या धुमश्चक्रीत चीनचे ३५ सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.

यूएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने गल्वान खोऱ्यात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मृत सैनिकांचे पारंपारिक दफन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले आहे. मात्र, हे अंत्यसंस्कार दूर करा आणि बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला त्यामध्ये सामील करू नका असेही निर्देश दिले आहेत.     

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love