कृषीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का -नव्या वादाला फुटले तोंड


परभणी: राज्यात शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्य सरकार आणि युजीसीमध्ये वाद सुरु आहे. अशातच आता राज्यातील अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील २४७ विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्याने  नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे स्पष्ट केल आहे. राज्य शासनाचे असे कोणतेही आदेश नाहीत, ज्या विद्यापीठांनी गुणपत्रिकेवर ‘कोविड-१९ प्रमोटेड असा शिक्का दिला त्या विद्यापीठाच्या संबंधित आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला देण्यात आले आहेत.

कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून शैक्षणिक वर्षाला ‘कोरोना’चा डाग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर

अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील २४७ विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी कृषी मंत्र्यांनी चौकशी आदेश दिले असून विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं आश्वासन पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांना कोविड-१९ प्रमोटेड अशा शिक्का देण्याचा निर्णय असा कोणत्याही कृषी विद्यापीठाने घेतला नसल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती येथील ज्या प्राचार्यांनी यावरील प्रतिक्रिया दिली आहे, त्यांना याप्रकरणी जाब विचारला जाणार असल्याचेही परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले. तसेच या वृत्तावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील कुलगुरू ढवण यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील विविध शाखांच्या तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-19 असा शिक्का असणार असल्याची बाब समोर आल्यानंतर या वादाला तोंड फुटले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love