लॉकडाऊनवरून पुण्यातील राजकीय वातावरण तापले- आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)—पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. खासदार गिरीश बापट यांनी गिरीश बापट यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याचा आरोप केला. तसेच असे निर्णय होत राहिले तर आम्ही यापुढे काय करायचं हे ठरवू, असा इशारा अजित पवार यांना दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्या, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हायरसशी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला. पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. १३ जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,’ असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे. पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे.  

‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण ३ टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी ९७  टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

गिरीश बापट यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याचा आरोप केला. तसेच असे निर्णय होत राहिले तर आम्ही यापुढे काय करायचं हे ठरवू, असा इशारा अजित पवार यांना दिला. यावर रुपाली चाकणकर यांनी बापट यांनी हीच हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विश्वासात न घेता पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा दाखवायला पाहिजे होती, असं म्हणत टोला लगावला.

लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी नाही –अजित पवार

दरम्यान, व्यापक लोकहित लक्षात घेवून हा निर्णय घेतला असून तो एकतर्फी नाही असे उपमुख्यमंत्री    अजित पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचा विचार करुनच पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनची गरज प्रशासनाकडून व्यक्त होत होती. पुण्यातील स्थिती आटोक्यात येण्यासाठी व्यापक विचार करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिका-यांनाही याची कल्पना होती. काही लोकप्रतिनिधीन्शी यासंबंधी फोनवरुन बोलणे केले होते. पुण्याच्या महापौरानाही कल्पना दिलेली होती. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी नसल्याचे पवार म्हणाले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *