येरवडा कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींचे खिडकीचे गज कापून पलायन

क्राईम महत्वाच्या बातम्या
Spread the love

पुणे- येरवडा कारागृहातील तात्पुरत्या कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाच जणांनी खिडकीचे गज कापून गुरुवारी पहाटे पलायन केल्याची घटना उघडकीस आले आहे. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. तर इतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या कैद्यांपैकी तिघे जण दौंड तालुक्यातील आहेत, एक कैदी पुणे शहरातील आणि एक हवेली तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी दौंड, वाकड आणि हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपींमध्ये देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे),  अक्षय कोडक्या चव्हाण,  ( रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे),  अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी), देवगन,  गणेश,  अक्षय हे तीनही आरोपी दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आहेत. अजिंक्य याच्यावर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयाच्या आवारात तात्पुरते कारागृह करण्यात आले आहे. या आवारातील चार करमण्काच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ५ मध्ये हे पाच जण त्यांनी रात्रभर खिडकीचे गज कापून व गज उचकटून पलायन केले. गुरुवारी पाहते चारच्या सुमारास हा परके घडला.

येरवडा तात्पुरत्या कारागृहात सध्या एकूण ५६८ आरोपींना ठेवण्यात आले आहे. मध्यंतरी दोन आरोपींनी पलायन केले होते.  बंदी पळून जाण्याच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सध्या पुणे पोलीस आयुक्तालय कडील दोन अधिकारी, बारा कर्मचारी, काराग्रह विभागाचा एक अधिकारी व १८ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरीदेखील बंदी पळून जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.याप्रकर

कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींगमधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला.

या प्रकरणी आता कारागृह आणि पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरु आहे. आरोपींना कारागृहातील इतर कैद्यांनी मदत केली आहे का, त्यांना बाहेरुन कोणाची मदत मिळाली का, याबाबत इतर कैदी आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

देवगन,  गणेश,  अक्षय हे तीनही आरोपी दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आहेत. अजिंक्य याच्यावर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

येरवडा तात्पुरत्या कारागृहात सध्या एकूण ५६८ न्यायाधीन बंदी  ठेवण्यात आलेले आहेत. बंदी पळून जाण्याच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सध्या पुणे पोलीस आयुक्तालय कडील दोन अधिकारी, बारा कर्मचारी, काराग्रह विभागाचा एक अधिकारी व १८ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरीदेखील बंदी पळून जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *