मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार?

राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)—मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या(गुरुवारी) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत”, अशी टीका भाजपकडून सातत्याने होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्याचा दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडलेला असताना मुख्यमंत्री एकदाही पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले नाही. यावरूनही विरोधकांनी त्यांना टार्गेट केले आहे. उद्या (गुरुवार) मुख्यमंत्री ठाकरे पुण्यात येऊन पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची आढावा बैठक ते घेणार आहेत. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असतील.

मुख्यमंत्री सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पुण्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुण्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विभागीय आयुक्तालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुण्यामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त होईल आणि सक्रीय रुग्णांची संख्या ९१ हजाराच्या पुढे असेल असा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सातत्याने टीकेचे धनी झालेल्या मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे.   

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाकरे ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. स्मार्ट सिटी वॉररुममध्येही ते पाहणी करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी पाच वाजता मुंबईकडे निघतील.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *