बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण, नानावटी रुग्णालयात दाखल


बिग बी  अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.  बच्चन यांची कोरोनाची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. त्यांनी  ट्वीट  करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांसह इतरांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोंना टेस्ट  करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

अमिताभ बच्चन  वयातील या टप्प्यातही खूप सक्रिय असतात. अमिताभ बच्चन घरी राहत असतानाही कोरोना काळात सतत कार्यरत होते. सर्व सरकारी मेसेजेस रेकॉर्ड करण्याशिवाय त्याने घरी असताना आपल्या प्रसिद्ध टीव्ही प्रोग्राम कौन बनेगा करोडपतीचा एक शॉर्ट फिल्म आणि 12 व्या सीझनचा प्रोमो देखील शूट केला. ते एकामागून एक वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.

अधिक वाचा  महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: कोकणात 'रेड अलर्ट', नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

अमिताभ यांची भूमिका असलेला गुलाबो सीताबो या चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे तो अमझोनवर रिलीज  झाला आहे.  चित्रपटात अमिताभने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. गुलाबो सीताबोने आयुष्मान खुरानाची अमिताभबरोबरची जोडी दाखविली. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ करत आहेत.

अभिषेकलाही लागण

दरम्यान, अमिताभ यांच्याबरोबरच अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांच्याबरोबर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेक यांनी याबाबतची माहिती ट्वीट वरून दिली आहे. माझ्या वडिलांची आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉसिटीव्ह आल्यामुळे आम्हाला दोघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. दोघांनाही ‘सौम्य लक्षणे’ आहेत, असे त्याने म्हटले आहे.

अधिक वाचा  २४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या 'राजपथ इन्फ्राकॉन'च्या नावावर:लिम्का बुक'मध्ये नोंद
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love