देशात सामुदायिक संसर्गाला सुरुवात? नोव्हेंबर पर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या होणार एक कोटी?

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—सर्व जगात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही विळखा अधिक घट्ट केला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 40 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 11 लाखांवर गेली आहे. लक्षद्वीप वगळता कोरोनाने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात प्रवेश केला आहे. काही राज्यांमध्ये सुरुवातीला नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. परंतु नंतर त्याही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार देशात कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) स्पष्टपणे म्हटले आहे की भारतातील कोरोनाची वाढती प्रकरणे ही सामुदायिक संसर्गाची परिणती आहे. त्यांच्या या दाव्यास अनेक तज्ञांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.

मात्र, केंद्र सरकार हे मान्य करण्यास तयार नाही. दिवसात 30 हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असूनही, देशात सामुदायिक संसर्गाची परिस्थिती निर्माण झालेली नाही असे सरकार जोर देऊन सांगत आहे. तज्ञांच्या मते सरकार सत्यापासून दूर पळत आहे, त्यांनी आता सत्य स्वीकारले पाहिजे.  सामुदायिक संसर्ग काय आहे? ही परिस्थिती धोकादायक का आहे? आधीच कोरोनाने ग्रस्त असलेल्या देशावर त्याचे दुष्परिणाम काय असतील? मी हे कसे टाळू शकतो? असे सर्व प्रश्न जे तुमच्या मनात याबाबत आपण जाणून घेऊ या…

सामुदायिक संसर्ग काय आहे हे सोप्या शब्दांत समजून घ्यायचे असेल तर जेव्हा साथीचा रोग समाजात इतका पसरतो की एखाद्या व्यक्तीला संसर्ग कोणामुळे झाला हे माहिती होत नाही, त्याला सामुदायिक संसर्ग म्हणतात किंवा संसर्ग झालेला व्यक्ती इतर कुठल्या संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आला? हे शोधणे जेव्हा अशक्य होते तेव्हा सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाली असे म्हणतात. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देशात सर्वात अगोदर या परिस्थितीचा स्विकार केला. त्यांनी तिरुअनंतपुरमच्या किनारपट्टीच्या भागातील लोकांमध्ये सामुदायिक संसर्गाची परिस्थिती निर्माण झाल्याचे कबुल केले. अशी कबुली देणारे ते देशात पहिले आहेत.

त्यानंतर, इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याला पुष्टी देत दररोज 30 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होणे हा सामुदायिक संसर्गाचाच परिणाम असल्याचे म्हटले आहे.

 कोणताही अज्ञात व्हायरस किंवा रोगाचा प्रसार होण्याचे चार टप्पे आहेत. हीच गोष्ट कोरोना विषाणूच्या बाबतीतही लागू होते. चौथा टप्पा हा सर्वात धोकादायक आहे.

पहिला टप्पा- कोणत्याही विषाणूचा प्रसार होण्याची ही पहिली पायरी आहे. यामध्ये विषाणूचा प्रसार कुठून झाला याची माहिती असते. त्याच्या प्रवासाचा मागोवा (ट्रॅॅवल हिस्ट्री ) घेतल्यास,त्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पसरण्यापासून रोखले जाऊ शकते.

दुसरा टप्पा: यात संक्रमित व्यक्तीचा विषाणू त्याच्या कुटूंबात किंवा ओळखीच्या व्यक्तींपर्यंत पोहोचतो. यामध्ये कॉन्टेक्ट ट्रेसिंग खूप महत्वाचे असते. या स्थितीमध्ये  लॉकडाउन, कंटेनमें  झोन तयार करुन व्हायरस पसरण्यापासून रोखता येऊ शकते. याला स्थानिक संक्रमण म्हणून संबोधले जाते.

तिसरा टप्पा:- याला सामुदायिक संसर्ग म्हटलं जातं. यामध्ये अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असते. कारण, या टप्प्यात विषाणु अतिशय वेगाने पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीस संसर्गाच्या स्त्रोताबद्दल कोणतीही माहिती नसते. जेव्हा स्त्रोताबद्दल कोणतीही माहिती नसते तेव्हा त्याला संसर्ग कसा झाला याचा शोध घेणे अशक्य होते.

चौथा टप्पा:- कोणत्याही विषाणुचा किंवा आजाराचा संसर्ग होण्याचा हा शेवटचा टप्पा आहे, जो सर्वात धोकादायक आहे. या टप्प्यावर हा रोग संबंधित भागात साथीच्या रोगाचे स्वरूप प्राप्त करतो. अशा परिस्थितीत मृत्यूची संख्या खूप वाढते. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका आणि इराण तिसरा टप्पा पार करून या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत.

हे धोकादायक का आहे? तर लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. समुदायातील संसर्गामुळे व्हायरस खूप वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांना संसर्ग होण्याचा धोका असतो.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही के मोंगा यांच्या म्हणण्यानुसार, हा आजार ग्रामीण भागात पसरायला लागला आहे, ही अत्यंत वाईट चिन्हे आहेत.ग्रामीण भागात आधीपासूनच चांगल्या वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती भयावह होऊ शकते.

आयसीएमआर सध्या दररोज २००० लोकांचे नमुने घेत आहे, सद्य परिस्थिती पाहता हे फारच कमी  आहे.आयआयटी भुवनेश्वर यांच्या अभ्यासानुसार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, पावसाळा व हिवाळ्यात हा विषाणू अधिक वेगाने पसरू शकतो. रुग्णांच्या संख्येत  दुपटीने वाढ होण्याचे प्रमाण 1.13 दिवसांपर्यंत वाढू शकते.

दुसर्‍या एका अभ्यासानुसार नोव्हेंबरपर्यंत देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीपर्यंत वाढू शकते. जर असे झाले तर परिस्थिती अत्यंत धोकादायक असेल.

संकट टाळण्याचे संभाव्य मार्ग

चाचणी: आरोग्य तज्ञांच्या मते, सर्व प्रथम, आम्हाला शक्य तितक्या चाचण्यांची संख्या  वाढविणे आवश्यक आहे. दक्षिण कोरियाने हेच पाऊल उचलले आणि या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवले.

सोशल डिस्टेंसिंग: देशात अशीही संसर्गग्रस्त लोकांची संख्या ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत सोशल डिस्टेंसिंगचे काटेकोर पालन केले पाहिजे.

मास्कचा वापर: डब्ल्यूएचओने सुद्धा कोरोना विषाणूचा प्रसार हवेमधून पसरू शकतो हे मान्य केले आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर केलाच पाहिजे.   

स्वच्छता: आपले हात स्वच्छ (सैनिटाइज) ठेवा आणि घरी परत आल्यावर साबणाने चांगले धुवा.

अलग ठेवणे: अगदी सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांनीदेखील घरीच अलग ठेवणे आवश्यक आहे. मात्र,अगदी सौम्य लक्षणांकडेसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही.

रोग प्रतिकारशक्ती वाढवा: बर्‍याच अभ्यासांनंतर आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्यास आपण कोरोनाशी लढा देऊ शकतो याला पुष्टी मिळाली आहे. म्हणून योग, व्यायाम आणि चांगल्या आहाराने तुमची प्रतिकारशक्ती बळकट करा.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

2 thoughts on “देशात सामुदायिक संसर्गाला सुरुवात? नोव्हेंबर पर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या होणार एक कोटी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *