कुंभमेळ्याचे भवितव्यही कोरोना लसीवरच अवलंबून;तरच होणार भव्य-दिव्य सोहळा


कुंभमेळ्याचे भवितव्यही कोरोना लसीवरच अवलंबून; तरच होणार भव्य-दिव्य सोहळा

डेहराडून(ऑनलाईन टीम)- सन २०२१ होणारा कुंभमेळा हरिद्वार येथे होणार आहे. परंतु या कुंभमेळ्याचे स्वरूप कसे असेल हे सर्व कोविड-१९ चा निपटारा करणाऱ्या लसीवर अवलंबून असेल. जर कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करणारी लस महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यापूर्वी बाजारात आलेली असेल तर हे महापर्व म्हणजेच कुंभमेळा नेहेमीप्रमाणे भव्य दिव्य स्वरुपात आयोजित करण्यात येईल. परंतु जर कोरोनाच्या संसर्गाची स्थिती सामान्य झाली नाही आणि कोरोनावर कुठलीही लस बाजारात आली नाही तर कुंभमेळ्याचे आयोजनही कांवड उत्सवाच्या धर्तीवरच होईल.

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी जाहीर केले आहे की ज्योतिष गणितानुसार महाकुंभ निश्चित केलेल्या तारखेला होईल. यासंदर्भात त्यांच्या अखाडा परिषदेच्या संत महात्मांसोबत बैठका सुरू आहेत.

अधिक वाचा  कारच्या विम्याचे नुतनीकरण करताय? तर हे दस्तऐवज आहे महत्वाचे

कोरोना संसर्गामुळे सरकार परिस्थितीवर नजर ठेवून आहे. त्यामुळे महाकुंभ मेळ्याचे स्वरूप कसे असेल याबाबत फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मंथन होईल. तत्कालीन परिस्थितीनुसार सरकारला निर्णयाय घ्यावा लागेल.  

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर सरकारने असे सूचित केले आहे की महाकुंभ मेळ्याचे भव्य आयोजन तेव्हाच होईल जेव्हा कोरोनासारख्या विषाणूपासून वाचण्यासाठी कुठलेतरी औषध    तयार केले जाईल. म्हणजेच फेब्रुवारी २०२१ पूर्वी सरकार कोरोना लस बाजारात येण्याची वाट सरकारला पहावी लागेल. जर तोपर्यंत कोरोनावर लस आली नाही तर सरकारला कावंड उत्सवा प्रमाणेच महाकुंभमेळ्यालाही नियंत्रण ठेवावे लागेल.

कोरोना कालावधीत झालेल्या कावंड यात्रेला आम्ही नियंत्रित केले. महाकुंभ दरम्यान त्या काळातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. जर त्यागोदर लस बाजारात आली तर कुंभमेळ्याचे स्वरूप भव्य आणि दिव्य असेल.  अन्यथा कावंड उत्सवा प्रमाणेच कुंभ मेळ्यातही गर्दी नियंत्रित केली जाईल असे उत्तराखंड सरकारचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love