कसा होतो कोविड-१९ चा प्रसार?-डब्ल्यूएचओचा नवीन इशारा


 वॉशिंग्टन(ऑनलाईनटीम)–जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोविड-१९ या विषाणूच्या संक्रमणाबाबत अधिकचा इशारा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग कशाप्रकारे होऊ शकतो अथवा कोणत्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो याबाबतच्या शिफारशींमध्ये डब्ल्यूएचओ अनेक बदल केले असून याबद्दलच्या नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.  

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका दिवसात संसर्ग झालेल्या संक्रमणाची संख्या प्रचंड वाढल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोविड -१९ च्या साथीची अवस्था अधिक धोकादायक बनली असल्याचा इशारा मंगळवारी दिला होता. आता कोविड-१९ या विषाणूच्या संसर्ग कसा होऊ शकतो अथवा या विषाणुचा प्रसार कसा होऊ शकतो याबाबतची माहिती दिली आहे.  

 डब्ल्यूएचओने  २९ मार्च २०२० रोजी ‘कोविड-१९ विषाणूचा प्रसार, त्याचा प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी लागू केलेल्या सावधगिरीच्या शिफारशींबाबत एक दस्तऐवज प्रकाशित केल होते. या दस्तऐवजामध्ये डब्ल्यूएचओने सुधारणा केली आहे. नवीन दस्तऐवजामध्ये कोणत्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, याची ताजी माहिती डब्ल्यूएचओने दिली आहे.  

अधिक वाचा  #दिलासादायक: पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस होते आहे कमी

कसा पसरतो कोविड-१९?

* संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन निरोगी व्यक्ती संक्रमित होऊ शकते.

* कोविड-१९ चा संसर्ग झालेली व्यक्ती शिंकल्यास अथवा खोकल्यास समोर उभे असलेल्या व्यक्तीला  कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.   

* कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तातूनही संसर्ग होण्याचा धोका असतो.

* कोरोनाचा संसर्ग झालेल्या आईपासून तिच्या बाळालाही संसर्ग होऊ शकतो.

* एखाद्या प्राण्याला कोरोणाचा संसर्ग झाला असेल तर,त्या प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर हा विषाणू मानवामध्ये पसरतो.

* कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने उघड्यावर केलेल्या शौचामुळेही विषाणु पसरतो आणि त्या विषाणुच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तीमध्ये तो पसरते.

* याव्यतिरिक्त, खोकताना किंवा शिंकताना हवेत थेंब पसरल्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो.

डब्ल्यूएचओने दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे प्रमुख टेड्रोस एडहेनम गेब्रयेसस  यांनी गेल्या आठवड्यात कोविड -१९ साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. जगातील कोविड -१९ साथीच्या आजाराची परिस्थिती अधिक धोकादायक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की पुढील काही काळासाठी आयुष्य पूर्वीसारखे सामान्य राहणार नाही. गेल्या सोमवारी गेब्रयेसस यांनी असा इशारा दिला आहे की नजीकच्या भविष्यात सर्व परिस्थिती पूर्वीप्रमाणे सामान्य होणे मुश्कील आहे.

अधिक वाचा  सीमा वादाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी भारत-चीनची कोअर कमांडर स्तरावर चर्चा

डब्ल्यूएचओचे महासंचालक म्हणाले की, अनेक देशांनी या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवले आहे आणि बरेच देश त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर युरोप आणि आशियातील अनेक देश चुकीच्या दिशेने जात आहेत. दिवसेंदिवस या दोन खंडातील परिस्थिती भयानक बनत चालली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love