मुंबई- अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र, निगेटिव्ह आली आहे.
वास्तविक, अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर आधी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्याची अँन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती, पण आता त्यांची स्वॅब टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याला कोरोनाचे कोणतेही चिन्ह नव्हते. त्याचे वर्णन लक्षणविरहीत केले गेले आहे. मात्र, ऐश्वर्या आणि आराध्या अजूनही घरीच आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याला घरातच विलीगीकरण किंवा त्यांनाही रुग्णालयात दाखल केले जाईल याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.