News24Pune – अमेरिकेने((America) शनिवारी रात्री इराणमधील(Iran) तीन महत्त्वाच्या अणुस्थळांवर( nuclear sites) भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या लष्कराने B-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर करून इराणच्या फोर्डो (Fordo), नटांझ (Natanz) आणि एसफहान (Isfahan) येथील अणुतळांना लक्ष्य केले.(US attack on Iran )
हे तिन्ही तळ इराणच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि जमिनीखाली खोलवर असल्याने, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी मासिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57A/B (‘बंकर बस्टर’) बॉम्ब टाकले. या बॉम्बमध्ये जमिनीच्या आत खोलवर, अंदाजे १८ मीटर काँक्रीट किंवा ६१ मीटर माती भेदण्याची क्षमता आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे तिन्ही आण्विक तळ उद्ध्वस्त झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
युद्ध तुम्ही सुरू केलं आहे, शेवट आम्ही करू
फोर्डो येथील अणुतळ तर जमिनीखाली ८० ते ९० मीटर खोल असल्याची माहिती आहे, ज्यामुळे त्याला भेदणे अत्यंत कठीण होते आणि केवळ अमेरिकेच्या बॉम्बमध्ये ती क्षमता होती. या हल्ल्यामुळे इराण प्रचंड संतापला असून, इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. “युद्ध तुम्ही सुरू केलं आहे, शेवट आम्ही करू. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष्य असेल,” अशी थेट धमकी इराणने दिली आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यापूर्वीच अमेरिकेने इस्रायल-इराण संघर्षात हस्तक्षेप केल्यास ते ‘अतिशय धोकादायक’ ठरेल असे म्हटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प [Donald Trump]यांनी रविवारी पहाटे अमेरिकन लष्कराने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती दिली. ट्रम्प यांनी या हल्ल्यांना ‘शानदार लष्करी यश’ असे संबोधले असून, अमेरिकन सैन्याच्या अचूकतेचे आणि वेगाचे कौतुक केले. “अमेरिकन लष्कराने केलेल्या या कामगिरीच्या आसपासही जगातील कोणतेही सैन्य जाऊ शकत नाही,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की या हल्ल्यानंतर इराण युद्ध थांबवेल आणि शांतता प्रस्थापित करेल. ट्रम्प यांनी इराणला शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करताना, शांतता न झाल्यास अधिक लक्ष्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेने राजनैतिक मार्गाने इराणशी संपर्क साधून, हे हल्ले एकमेव उद्देशाचे होते आणि ‘राजवट बदलाचे’ प्रयत्न नियोजित नाहीत असे स्पष्ट केले आहे.
अयातुल्ला खामेनी यांनी महत्त्वाचा निर्णय
या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी [Ayatollah Khamenei]यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून हत्येचा धोका असल्याने, खामेनी यांनी त्यांना काही झाल्यास आपले तीन उत्तराधिकारी निवडले आहेत. वास्तविक पाहता, इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या अनेक अणु आणि लष्करी लक्ष्यांवर अचानक हल्ला करून इराणचा अणुकार्यक्रम मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. इराणने आपल्या अणु महत्त्वाकांक्षा शांततापूर्ण असल्याचे म्हटले असले तरी, इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराण लवकरच अणुबॉम्ब बनवण्याच्या स्थितीत होता. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने शेकडो रॉकेट्स आणि ड्रोन इस्रायलवर डागले होते, ज्यामुळे हा संघर्ष आता एका आठवड्याहून अधिक काळ सुरू आहे. या संघर्षात इराणचे लष्करी तळ मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराण आणखी कमकुवत झाला असला तरी, तो अजूनही मोठे नुकसान करण्यास सक्षम आहे.
इराणची अमेरिकेला धमकी
इराणने अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांना लक्ष्य करण्याची थेट धमकी दिली आहे, ज्यात बहारामधील अमेरिकेच्या नौदलाचे ५ वे ताफा मुख्यालय (5th Fleet HQ) प्रमुख लक्ष्य असू शकते. तसेच, पर्शियन गल्फला हिंदी महासागराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या ‘स्ट्रेट ऑफ हॉरमुझ’ (Strait of Hormuz) या शिपिंग मार्गाला लक्ष्य करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, जिथून जगातील ३० देशांना तेलाचा पुरवठा होतो. इराणने अणुस्थळांमधून सामग्री खूप पूर्वीच बाहेर काढली होती, त्यामुळे त्यांना मोठे नुकसान झाले नाही असा दावा इराणच्या सरकारी वाहिनीचे उप-राजकीय संचालक हसन आबेदिनी यांनी केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी अणुसंशोधन सुविधा ‘पूर्णपणे उद्ध्वस्त’ झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने देशभरातील सुरक्षा कडक केली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार, अध्यक्षांना युद्धाची औपचारिक घोषणा करण्यासाठी काँग्रेसची (संसद) परवानगी लागत नाही, परंतु ते लष्करी कारवाई करू शकतात. या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय घेतला असून, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवतावादी कारणे दिली आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावरही विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.