स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ‘अवन्स सेरीज६’ (Aones Series6) उपकरणाची पुण्यात निर्मिती


पुणे-पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या विषारी वायुला शोषून घेणारे ‘एवन्स सेरीज ६’ (AoneS Series 6) हे पहिले स्वदेशी उपकरण बनविले आहे. संशोधित केलेल्या या भारतीय बनावटीच्या उपकरणाचा खर्च सध्या वापरात असलेल्या उपकरणांच्या तुलनेने बराच कमी असल्याचे एवन्स लॅबचे संस्थापक काळुसकर यांनी सांगितले.

लेसर किंवा इलेक्ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या घातक वायूंना शोषून घेण्यासाठी परदेशी व महागड्या उपकरणांचा वापर केला जातो. त्याला पर्याय म्हणून ‘एवन्स सेरीज ६’ हे पहिलेच स्वदेशी उपकरण पुण्यातील ‘एवन्स लॅब्ज’ (AoneS Labs) या कंपनीने बनविले आहे. या उपकरणाचा फायदा शल्यविशारदांबरोबरच भूलतज्ज्ञ आणि शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला होईल.    
शस्त्रक्रियेदरम्यान अनेक घातक व संसर्गजन्य वायू निघत असतात, ज्यापासून शल्यविशारद डॉक्टरांना व त्यांच्या टीमला धोका होऊ शकतो. त्यामुळे असे विषारी वायू शोषून घेणाऱ्या उपकरणांची शस्त्रक्रिया विभागात आवश्यकता भासते. यात लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये हे उपकरण ‘ट्रोकार’शी जोडले जाते आणि ओपन सर्जरीमध्ये ते ‘काॅटरी’ ला जोडले जाते. यामध्ये वायू विविध फिल्टर आणि रेडिएशन चेंबरमधून जाऊन निर्जंतुक होतो.

अधिक वाचा  गुगल आणणार भारतात कमी किंमतीत स्मार्टफोन?

सध्या यासाठी आपल्या देशात अमेरिका, जर्मनी, जपान येथील कंपन्यांचे उपकरण मागवले जाते. त्यामुळे या उपकरणाचा खर्चही खूप आहे. त्या तुलनेत या भारतीय बनावटीच्या उपकरणाची किंमत निम्मी असून त्याचा देखभाल खर्चही निम्मा आहे. या उपकरणाचा थेट रुग्णाशी संपर्क येत नसल्याने त्याला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. परंतु तरीही भारतीय गुणवत्ता परिषदेचा भाग असलेल्या ‘चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी (एन.ए.बी.एल.) राष्ट्रीय मान्यता मंडळा’चा परवाना या उपकरणास असल्याचे काळुसकर यांनी सांगितले. दर महिन्याला ७५ उपकरणे बनविण्याची लॅबची क्षमता असून आवश्यकतेनुसार त्याचे प्रमाण वाढवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

या उपकरणाविषयी बोलताना काळुसकर म्हणाले, “अनेक शल्यविशारदांचे काम मी जवळून बघितले आहे शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या वायूंनी त्यांना धोका होण्याची शक्यता असते. या उपकरणाची आवश्यकता लक्षात घेण्याबरोबरच डॉक्टरांची गरज, खर्च, उपकरणाचा उपयोग या सगळ्याचा वर्षभर अभ्यास करून आम्ही उपकरण बनविले आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love