मसालाकिंग धनंजय दातार यांच्याकडून फुफ्फुसाच्या आजारग्रस्त रुग्णांना प्राणवायू संचांचे वाटप

पुणे- करोनाची प्राणघातक साथ मानवजातीला खूप काही शिकवून गेलीय. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तशर्करेचे प्रमाण, हृदयाचे ठोके याप्रमाणेच आजकाल श्वासोच्छवासातील प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पातळीवरही काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी दुर्बळ रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचा तत्काळ पुरवठा अत्यंत मोलाचा ठरत आहे आणि एका श्वासाची किंमत जगाला आता उमगू लागली आहे. ‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटर’च्या वतीने […]

Read More

ऑक्सिजन सिलींडर व वैद्यकीय उपकरणांनी २५ ऑटोरिक्षा ॲम्ब्युलन्सचा ताफा सज्ज: मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे अर्थसहाय्य

पुणे -दुबईस्थित अल अदील समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी रिक्षा ॲम्ब्युलन्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित स्वदेश सेवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम या दोन स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन […]

Read More

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट

पुणे-कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री […]

Read More