सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच राज्याचा कारभार पाहत आहेत : शरद पवार यांचा टोला

पुणे—मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा असल्याचं दिसत आहे. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत बोलताना लगावला. हे साहाजिक आहे. ते सत्ताधारी आहेत, […]

Read More

शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

पुणे–काही ग्रंथ, काही पुस्तके ही महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली. त्यांच्या हजारो प्रती निघाल्या आणि लोकांनी घरा-घरात त्या ठेवल्या, वाचल्या. दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही. मला बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. […]

Read More

शिवाजीराव आढळराव पाटलांचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी 2009 लाच होणार होती

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सन २००९ मध्येच शिवसेना-राष्ट्रवादीची युती होणार होती असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांना पंतप्रधान करण्याकरता शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला असा दावा करतानाच […]

Read More

उद्धव ठाकरेंच्या अडचणी कमी होईनात : शिवसेनेचे खासदारही जाणार शिंदे गटात?

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेनेच्या खासदारांचा मात्र, शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला असल्याचे समोर येत आहे.  त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे. […]

Read More

साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे – उद्धव ठाकरे

पुणे–साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखरप्रश्नी सर्वपक्षीयांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे उचित होईल, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आयोजित साखर परिषद-2022 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी […]

Read More

येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन कारखाने सुरू करण्यापूर्वीच करा -शरद पवार

पुणे- गतवर्षी झालेला पाऊस आणि येत्या वर्षीची पावसाची अनुकूलता लक्षात घेता उसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन कारखाने सुरू करण्यापूर्वीच करावे लागेल, अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री (Agriculture Minister) शरद पवार (sharada Pawar) यांनी शनिवारी येथे केली. इथेनॉल (Ethenol) खरेदीबाबत तेल कंपन्यांचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला नसून, याविषयावर मार्ग काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची […]

Read More